विशेष प्रतिनिधी
लखनौ – तब्बल चौदा तासांच्या प्रवासानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी पंजाबमधील रोपड येथील तुरुंगातून बाहुबली नेता मुख्तार अन्सारी याला आज पहाटे साडेचारच्या सुमारास बांदा येथील तुरुंगामध्ये आणले. Bahubali Ansari was finally brought to Yogi Adityanath UP There is no VIP treatment in prison
उत्तरप्रदेश पोलिसांचे पथक मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अन्सारीला घेऊन रोपड येथून निघाले. पोलिसांच्या ताफ्यामध्ये दहा गाड्यांचा समावेश होता. यामध्ये दीडशे कर्मचारी होते. गाड्यांचा हा ताफा पतियाळा रोड मार्गे सायंकाळी चारच्या सुमारास हरियानातील करनाल येथे पोचला. यानंतर नोएडा, मथुरा, आग्रा, देहात, हमीरपूर मार्गे पहाटे ४.३४ च्या सुमारास तो यूपीतील बांदा येथे पोचला.
पंजाबमध्ये व्हीलचेअरवरून रुग्णवाहिकेमध्ये बसणारा अन्सारी यूपीमध्ये पोचल्यानंतर मात्र गाडीतून उतरून थेट तुरुंगामध्ये चालत गेला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसून येत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी डॉक्टरांच्या एका पथकाने त्याची तपासणी देखील केली.
अन्सारी याला सुरुवातीला बराक क्रमांक पंधरामध्ये ठेवण्यात आले होते पण नंतर त्याला सोळा क्रमांकाच्या बराकीमध्ये हलविण्यात आले. याआधी अन्सारीला याच बराकीमध्ये ठेवण्यात आले होते. येथे अन्सारीची कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. अन्सारीला ज्या बराकीमध्ये ठेवण्यात येईल तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून तिथे त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही कैद्याला ठेवले जाणार नाही.
अन्सारीला या तुरुंगामध्ये कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार नसल्याचे तुरुंग प्रशासन विभागाचे मंत्री जयप्रतापसिंह जॅकी यांनी सांगितले. सर्वसामान्य कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच अन्सारीला येथे देण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येईल.
Bahubali Ansari was finally brought to Yogi Adityanath UP There is no VIP treatment in prison
इतर बातम्या वाचा…
- ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?
- इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य
- मुंबईसह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा, अनेक ठिकाणी काळाबाजार
- मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका
- अनिल परब हे नार्को टेस्ट, एनआयए, सीबीआय, रॉ चौकशीला सामोरे जाण्यास तयार…; पण त्यांचा मंत्रीपद सोडण्यास नकार