विशेष प्रतिनिधी
छिंदवाडा : मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसने पुन्हा सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग सुरू केला आहे आणि या प्रयोगातूनच मागच्या दारातून हिंदुत्वात प्रवेश करण्याचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी प्रयत्न चालवला आहे. राम कथेच्या निमित्ताने या पिता – पुत्रांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबांचे छिंदवाड्यात जोरदार स्वागत केले आहे. बागेश्वर बाबांचे स्वागत करताना कमलनाथ त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. Bageshwar Baba is welcomed by Kamal Nath and his son
2023 वर्षाखेरीस मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. काँग्रेसने तिथे जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावले जात आहेत. त्यापैकी एक हातखंडा म्हणजे सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग. राहुल गांधींनी 2019 च्या निवडणुकीत याच सॉफ्ट हिंदुत्वातून जोरदार टेम्पल रन केले होते. ते जातील त्या गावातल्या मंदिरात भेटी देत होते. कमलनाथ देखील तोच प्रयोग नव्याने मध्य प्रदेशात राबवत आहेत.
कमलनाथ आणि नकुलनाथ या पिता – पुत्रांनी त्यांनी बागेश्वर बाबांच्या राम कथेचे छिंदवाड्यात आयोजन केले आहे. या राम कथेच्या निमित्ताने बागेश्वर बाबा छिंदवाडाच्या विमानतळावर आले, तेव्हा या पिता-पुत्रांनी त्यांचे नतमस्तक होऊन पुष्पहार आणि स्वागत केले. विमानतळापासून त्यांची मोठी मिरवणूक काढली याचे व्हिडिओ सोशल मीडियावर फिरले अनेकांनी पिता-पुत्रांना ट्रोल केले, तर भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कमलनाथांना चिमटे काढून घेतले. निवडणूक जवळ आली की काँग्रेसला हिंदुत्व आठवते. राम आठवतो. निवडणूक संपली, सत्ता मिळाली हेच काँग्रेस नेते दर्ग्यांमध्ये जायला लागतात, अशा शब्दांत अनेकांनी कमलनाथ आणि नकुलनाथ या पिता – पुत्रांचे वाभाडे देखील काढले आहेत.
Bageshwar Baba is welcomed by Kamal Nath and his son
महत्वाच्या बातम्या
- ‘चांद्रयान-3’ बद्दल GOOD NEWS! चंद्राच्या कक्षेत पोहोचले, ‘इस्रो’ने दिली माहिती
- नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!
- Earthquake: दिल्ली-एनसीआर मध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप, लोक घाबरून पळाले घराबाहेर
- तामिळनाडू : मंत्री व्ही.सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर ‘ED’चा छापा!