• Download App
    दिवसभर प्रशासकीय काम आणि रात्री दहानंतर बॅडमिंटनचा सराव, अपंगत्वावर मात करीत नोएडाचे जिल्हाधिकारी असलेल्या आयएएस अधिकाºयाने मिळविले पॅरॉलिम्पिकमध्ये रौप्यपदक|Badminton practice after ten everydays after administrative work, Noida District Collector's IAS officer overcomes disability, wins silver medal in Paralympics

    दिवसभर प्रशासकीय काम आणि रात्री दहानंतर बॅडमिंटनचा सराव, अपंगत्वावर मात करीत नोएडाचे जिल्हाधिकारी असलेल्या आयएएस अधिकाऱ्याने मिळविले पॅरॉलिम्पिकमध्ये रौप्यपदक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आयएएस अधिकारी आणि नोएडासारख्या महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी. त्यामुळे दिवसभर प्रशासकीय काम आणि रात्री दहा वाजल्यानंतर बॅडमिंटन खेळाचा सराव करून सुहास यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळविले.Badminton practice after ten everydays after administrative work, Noida District Collector’s IAS officer overcomes disability, wins silver medal in Paralympics

    यथिराज म्हणाले, 2016 मध्ये उत्तरप्रदेशच्या आजमगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना एका बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मी उद्घाटन कार्यक्रमाचा अतिथी होतो आणि स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तोपर्यंत माझ्यासाठी बॅडमिंटन खेळणे माझी फक्त आवड होती. आजमगड येथील स्पर्धेत मला खेळण्याची संधी मिळाली.



    मी त्या संधीचे सोने करीत राज्यस्तरीय खेळाडूंना पराभूत केले होते. पॅराबॅडमिंटनचे विद्यमान प्रशिक्षक गौरव खन्ना यांनी त्यावेळी मला पाहिले व व्यावसायिकतेच्या रूपात बॅडमिंटनला स्वीकारण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. यावर्षीच त्यांनी बिगरमानांकित असतानाही बीजिंग येथील आशियाई स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदक जिंकले होते.

    सुहासन यांनी 2017 व 2019मध्ये बीडब्ल्यूएफ तुर्की पॅराबॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकेरी आणि दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी ब्राझील येथे 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.पॅरालिम्पिकमध्ये खेळणे त्यांचे स्वप्न होते. या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनातील किमती सहा वर्षे समर्पित केली आहेत.

    रौप्यपदक त्या मेहनतीचेच फळ आहे. निकालाकडे लक्ष न देता चांगल्यात चांगला खेळ खेळण्यास मी त्यांना सांगितले होते. त्यांनी केलेही तसेच. त्यांच्या परिश्रमाचेच हे फळ आहे, असे सुहास यथिराज यांच्या पत्नी ऋतू यांनी सांगितले.यथिराज यांच्या पत्नी ऋतू गाझियाबाद येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. या दोघांना दोन मुले आहेत.

    Badminton practice after ten everydays after administrative work, Noida District Collector’s IAS officer overcomes disability, wins silver medal in Paralympics

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट