• Download App
    Akshay Shinde नागरिकांचा विरोध मोडून अक्षय शिंदेचा दफनविधी

    Akshay Shinde : नागरिकांचा विरोध मोडून अक्षय शिंदेचा दफनविधी, हायकोर्टाने सरकारला दिला होती सोमवारपर्यंतची मुदत

    Akshay Shinde

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ( Akshay Shinde ) याच्या मृतदेहावर अखेर सहा दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. उल्हासनगर येथील शांतिनगर स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला. या दफनविधीस उल्हासनगरमधील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत स्मशानभूमीत येऊन आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दफनविधीसाठी सोमवारपर्यंत जागा मिळवून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.



    23 सप्टेंबर रोजी अक्षयचे पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आले. 24 सप्टेंबरला मुंबईतील जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टेमनंतर अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला होता. मृतदेहावर बदलापूर, अंबरनाथ आणि कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यास तेथील नागरिकांनी तसेच मनसेने जोरदार विरोध दर्शवला हेाता. अंबरनाथ स्मशानभूमीत विरोधाचे फलकही लावलेे होते. गेल्या ३ दिवसांपासून त्याच्या कुटुंबीयांकडून जागेचा शेाध सुरू होता. अक्षयचा मृतदेह दफन करण्यास जागा मिळत नसल्याने त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी वकील अमित कटारनवरे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सोमवारपर्यंत जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले हेाते.

    Badlapur Minor Rape Accused Akshay Shinde’s burial, HC deadline till Monday

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी