पत्नी श्रीकला देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. Baahubali Dhananjay Singh announced his support for BJP see what he said
विशेष प्रतिनिधी
जौनपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापले आहे. जनसत्ता दल लोकतांत्रिकचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कुंडाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया आणि जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. बाहुबली नेते धनंजय सिंह यांनी मंगळवारी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यांची पत्नी श्रीकला देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
जौनपूरचे माजी खासदार धनंजय सिंह यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. धनंजय सिंह यांनी सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आहे.असे ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की आज जे लोक माझ्यासोबत आहेत त्यांचा कल भाजपकडे आहे हे मला माहीत आहे. जनभावनेचा आदर करत आम्ही भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. माझी पत्नी श्रीकला येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करू शकते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, माझा आक्षेप नाही.
Baahubali Dhananjay Singh announced his support for BJP see what he said
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!