नाशिक : हातात लाल संविधान घेऊन आणि मुखात लोहिया + मधू लिमये यांच्या गोष्टी सांगत INDI आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी करायची असल्याचा दावा केला. सध्याच्या निवडणुकांमध्ये राजकीय वैर वाढते. एकमेकांवर व्यक्तिगत चिखलफेक होते. तसला कुठलाही प्रकार मला करायचा नाही. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक मला एकदम सभ्य करायची आहे, असे बी सुदर्शन रेड्डी म्हणाले. पण त्यावेळी त्यांच्या हातात राहुल गांधी घेतात, ते लाल संविधान होते आणि मुखात राम मनोहर लोहिया आणि मधू लिमये यांच्या गोष्टी होत्या.
बी. सुदर्शन रेड्डी यांनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले मतभेद परखडपणे विशद करून सांगितले. संघाची संघटना आणि तिचे कार्य याविषयी मला काही म्हणायचे नाही, असा दावा करून सुदर्शन रेड्डी म्हणाले, मी मूळातला लोकशाही संविधान मानणारा व्यक्ती आहे. बाबासाहेबांनी राज्यघटनेत लोकशाही समानता बंधुता ही तत्वे आग्रहाने मांडली. त्याचा मी पुरस्कार करतो. मी धर्मनिरपेक्ष आहे. दोन समाजांमध्ये भांडणे लावून निवडणुका जिंकण्याची मला सवय नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान मला पटत नाही.
त्यापुढे जाऊन बी. सुदर्शन रेड्डी यांनी आपली राजकीय वाढ कशी झाली, याचे वर्णन केले. मूळात महाविद्यालयीन जीवनात मी लोहियांच्या प्रभावाखाली आलो. हैदराबाद मध्ये लोहियांनी दिलेल्या प्रत्येक व्याख्यानाला मी हजर राहिलो. लोहिया, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, राजनारायण, मुलायम सिंग यादव यांचा माझ्यावर कायम प्रभाव राहिला. हैदराबाद मधल्या लोहिया ट्रस्टच्या कामात मी कायम सक्रिय राहिलो, असे बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले.
– पण लोहियांच्या तत्त्वाचा झेंडा ठेवला खाली
पण सुदर्शन रेड्डी यांच्या वक्तव्यात समाजवाद्यांप्रमाणेच राजकीय विसंगती देखील ठळकपणे डोकावली. राम मनोहर लोहिया यांनी आयुष्यभर काँग्रेस विरोधी राजकारण केले. त्यांनी काँग्रेस विरोधामध्ये सगळ्या विरोधकांचे एकत्रीकरण केले. आपापसांमधले किरकोळ मतभेद विसरायला लावले. काही विशिष्ट राजकीय मतभेद असले, तरी काँग्रेसच्या विरोधात राजकीय विरोधकांचे ऐक्य साधता येऊ शकते, याचा धडा राम मनोहर लोहिया यांनी घालून दिला. मधू लिमये यांनी जेवढा संघाला विरोध केला, तेवढा विरोध राम मनोहर लोहिया यांनी केला नाही. उलट त्यांचे आणि गोळवलकर गुरुजी यांचे वैयक्तिक संबंध अतिशय मधूर होते. हे सगळे राजकीय सत्य बी. सुदर्शन रेड्डी सोयीस्कर रित्या विसरून गेले. त्याउलट त्यांनी राहुल गांधी जे लाल संविधान हातात घेऊन प्रचार प्रसार करतात, ते संविधान त्यांनी हातात घेतले आणि तोंडी लोहिया + मधू लिमये यांच्या गोष्टी सांगितल्या. ते काँग्रेस प्रणित INDI आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बनले. इथे त्यांनी लोहियांच्या काँग्रेस विरोधी तत्त्वज्ञानाचा झेंडा खाली ठेवला.
B. Sudarshan Reddy praised Ram Manohar Lohiya, but acted against his philosophy
महत्वाच्या बातम्या
- शक्ती संवादातले चिंतन महिला विषयक धोरणात परावर्तित करायची ग्वाही मुख्यमंत्री देतात तेव्हा…
- Malayalam Actress : मल्याळी अभिनेत्रीचा आरोप- काँग्रेस आमदाराने हॉटेलमध्ये बोलावले; आक्षेपार्ह संदेश पाठवले
- Historic changes in GST : जीएसटीमध्ये ऐतिहासिक बदल: सामान्यांना दिलासा, महागड्या वस्तूंवर अधिक कर
- Goa Speaker Ramesh Tawadkar : गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर यांचा राजीनामा; मंत्रिमंडळात सामील