वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने सर्वसामान्यांना एक खूशखबर दिली आहे. यानुसार, ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय स्मारकांमध्ये नागरिकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. सर्वजण आझादी का अमृत महोत्सव साजरे करताना दिसत आहेत. आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने देशात वेगवेगळ्या पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन पाहायला मिळत आहेत.Azadi Ka Amrit Mahotsav : Free Entry to National Historical Monuments, Archaeological Sites, Museums till August 15!!
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) देशभरातील संरक्षित स्मारकांमध्ये म्हणजेच ऐतिहासिक वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. एरवी या स्मारकांमध्ये भेट देण्यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जात असते ते पूर्णपणे माफ केले आहे.
ASI ने जारी केलेला हा आदेश 5 ऑगस्टपासून लागू झाला असून, तो 15 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. ASI चे स्मारक-2 संचालक डॉ. एन. के. पाठक यांनी सांगितले की, 5 ऑगस्टपासून सर्व स्मारके, संग्रहालये आणि पुरातत्व स्थळांमध्ये पर्यटकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. या सर्व ठिकाणी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. या संदर्भातील माहिती सर्व प्रादेशिक संचालकांना देण्यात आली आहे. देशात 3,600 हून अधिक प्रत्येक अतुलनीय सौंदर्य, इतिहास आणि महत्त्व यांचा अभिमान असणाऱ्या ASI-संरक्षित वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश मिळणार आहे.
150 हेरिटेज स्थळांवर फडकणार तिरंगा
याशिवाय ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने स्वातंत्र्यदिनी भारतातील 150 वारसा स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून 150 केंद्रीय संरक्षित स्मारके, स्थळांवर तिरंगा फडकावला जाणार आहे. यासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या एका निवेदनात म्हटले की, देशभरातील 750 स्मारकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
Azadi Ka Amrit Mahotsav : Free Entry to National Historical Monuments, Archaeological Sites, Museums till August 15!!
महत्वाच्या बातम्या
- उपराष्ट्रपती निवडणूक : 450 ते 528 चा प्रवास; “लवचिक” मोदींच्या नेतृत्वात एनडीए आणखी मजबूत; विरोधी ऐक्य धुळीस!!
- उपराष्ट्रपती निवडणूक : 528 मते मिळवत जगदीप धनगड विजयी; खासदारांची तब्बल 15 मते बाद; ठाकरे गटाच्या 4 खासदारांचे मतदानच नाही!!
- उपराष्ट्रपती निवडणूक : ठाकरे गट शोधतोय पवारांपासून वेगळा होण्याचा मार्ग; ठाकरे गटाच्या फक्त 3 खासदारांचे मतदान!!
- दिल्ली दौरा : मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंध नाही, कोणतीही कामे अडलेली नाहीत!!; एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर