• Download App
    Ayushman Bharat Yojana 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना आयुष्मान भारत योजनेचे कव्हर

    Ayushman Bharat Yojana : 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना आयुष्मान भारत योजनेचे कव्हर; मोदी सरकारचा 6 कोटी नागरिकांना दिलासा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतात आता 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेअंतर्गत कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. 70 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. याचा 6 कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल. या योजनेत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हरेज दिले जाईल.

    केंद्रा सरकारच्या या निर्णयानंतर 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता, AB PM-JAY चे लाभ दिले जातील. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी केले जाईल. AB PM-JAY अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांतील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल

    केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 मोठे निर्णय घेतले. आयुष्मान भारत अंतर्गत 70 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज दिले जाईल. याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळात आणखी 5 मोठे निर्णय घेण्यात आले. जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेतील दुरुस्तीची मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाच्या वतीने ई-बसच्या खरेदी आणि संचालनासाठी PM-eBus सेवा-पेमेंट सुरक्षा यंत्रणा (PSM) योजना सुरु करण्यात आली आहे.

    PM इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेईकल प्रमोशन (पीएम ई-ड्राइव्ह) योजनेला दोन वर्षांच्या कालावधीत 10,900 कोटी रुपयांच्या खर्चासह, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आर्थिक वर्ष 2024-25 ते 2028-29 दरम्यान – IV ( PMGSY-IV) आणि ‘मिशन मौसम’ला दोन वर्षांमध्ये 2,000 कोटी रुपयांच्या खर्चासह अधिक हवामान-सज्ज आणि हवामान-स्मार्ट भारत तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

    Ayushman Bharat Yojana

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार