• Download App
    Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेबद्दल मोठे अपडेट ; जाणून आनंद होईल | The Focus India

    Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेबद्दल मोठे अपडेट ; जाणून आनंद होईल

    Ayushman Bharat Yojana

    सध्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत एकूण 25 आरोग्य पॅकेज दिले जातात.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Ayushman Bharat Yojana भारत सरकारकडून वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात. देशातील करोडो लोक या योजनांचा लाभ घेत आहेत. काही महिलांसाठी, काही तरुणांसाठी तर काही वृद्धांसाठी चालवल्या जात आहेत. विशेष म्हणजे सरकारही शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. जेणेकरून त्यांना कल्याणकारी आणि आर्थिक लाभ मिळू शकतील. दरम्यान, लोकांच्या आरोग्यासाठी चालवण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत योजनेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.Ayushman Bharat Yojana



    लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अनेक आजारांचा समावेश करण्यात आला होता पण आता त्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली आहे. होय, आयुष्मान योजनेअंतर्गत अल्झायमर, स्मृतिभ्रंश, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांवर आता पीएमजेवाय कार्डद्वारे उपचार करता येणार आहेत.

    सध्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत एकूण 25 आरोग्य पॅकेज दिले जातात. मात्र आता लवकरच त्यात आणखी पाच प्रमुख आजारांची भर घालण्याची तयारी सुरू आहे. यासोबतच या योजनेची व्याप्ती वाढवून आणखी अनेक लोकांना याचा आरोग्य लाभ घेता येणार आहे.

    Big update about Ayushman Bharat Yojana

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’