• Download App
    हर्बल सिगारेट ! आरोग्यासाठी फायदेशीर आयुर्वेदिक सिगारेटला पेटंटAyurvedic cigarettes manufactured in Pune have been patented.

    PUNE: हर्बल सिगारेट ! आरोग्यासाठी फायदेशीर आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट ! १०वर्ष-३पिढ्यांचे प्रयत्न-पुण्यातील संशोधनाला यश…

    पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट विकसित करणाऱ्या त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. संशोधक डॉ. राजस नित्सुरे यांनी ही माहिती दिली आहे.Ayurvedic cigarettes manufactured in Pune have been patented.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे .याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला ठाऊक आहेत, त्यामुळे धूम्रपान करण्याचा सल्ला कोणी देत नाही.मात्र आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या धुम्रपानाचा शोध लागला आहे. पुण्यामध्ये तयार झालेल्या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळाले आहे .

    तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही सिगारेट आहे.

    पुण्यातील अनंतवेद आयुर्वेद गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक क्षेत्रात संशोधन करत आहेत. आयुर्वेदिक सिगारेट विकसित करणाऱ्या त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले आहे. संशोधक डॉ. राजस नित्सुरे यांनी ही माहिती दिली आहे. तीन पिढ्यांनी अथकपणे सलग 10 वर्ष याबाबत संधोधन केले आहे. धूम्रपानाच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना आयुर्वेदिक धुम्रपानाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे आपण याचा कधीही वापर करू शकतो आणि बंदही. व्यसनाधीनतेकडून आरोग्य संपन्नतेकडे नेणारे हे संशोधन असल्याचे डॉ राजस सांगतात.

    आयुर्वेदिक धुम्रपान ही भारतीय आयुर्वेदातील एक चिकित्सा आहे. त्याचाच वापर करून आयुर्वेदिक सिगारेट तयार करण्यात आली आहे. कफसारख्या विकारावर ही एक उपचार पद्धती आहे. श्वसनाशी संबंधित आजारावर ही उपचार पद्धती परिणामकारक ठरत असून व्यसनाधीन व्यक्तींना आयुर्वेदिक औषधी गोष्टींचा वापर करुन सिगारेट जर उपलब्ध झाल्यास त्यांची व्यसनातून मुक्तता होऊ शकते. त्याच अनुषंगाने हे संशोधन झाले आणि त्याला अखेर पेटंट प्राप्त झाले.

    तीन महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलं असून एकूण हे संशोधन यशस्वी ठरलं असल्याचं डॉ. राजस नित्सुरे यांनी सांगितलं आहे.

    Ayurvedic cigarettes manufactured in Pune have been patented.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार