• Download App
    आयुर्वेद, योग आणि होमिओपॅथी उपचारांचाही विमा होणार! IRDA ने उचललं मोठं पाऊल Ayurveda Yoga and Homeopathy treatments will also be insured Big step taken by IRDA

    आयुर्वेद, योग आणि होमिओपॅथी उपचारांचाही विमा होणार! IRDA ने उचललं मोठं पाऊल

    जाणून घ्या सर्वसामान्यांना कधी मिळणार फायदा?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विमा क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. विमा नियामक IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) सारख्या उपचारांचा समावेश करण्यास सांगितले आहे. यामुळे विमा पॉलिसीची लोकप्रियता वाढेल आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल. Ayurveda Yoga and Homeopathy treatments will also be insured Big step taken by IRDA

    IRDA ने म्हटले आहे की, सामान्य विमा कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसींमध्ये आयुष उपचाराचाही समावेश करावा. यासाठी कंपन्या त्यांच्या बोर्डाची मंजुरी घेतल्यानंतर योग्य मार्गदर्शक तत्त्वे सादर करतील. तसेच सर्व सामान्य विमा कंपन्यांना 1 एप्रिल 2024 पर्यंत मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील आणि ती नवीन आर्थिक वर्षापासून लागू होईल. असेही IRDAकडून सांगण्यात आले आहे.

    कंपन्यांनी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गुणवत्ता आणि मानकांवर भर द्यावा, असे IRDAकडून सांगण्यात आले आहे. तसेच आयुष रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची व्यवस्था करण्यात यावी. आयुष उपचार गेल्या काही वर्षात खूप लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांनी आयुष उपचाराला इतर उपचार पद्धतींप्रमाणेच महत्त्व दिले पाहिजेत. असंही म्हटलं गेलं आहे.

    Ayurveda Yoga and Homeopathy treatments will also be insured Big step taken by IRDA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र