• Download App
    आयुर्वेदामुळे परतली केनियाच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीची दृष्टी ; पंतप्रधान मोदींनीही केला उल्लेख। Ayurveda brings back the vision of the daughter of the former Prime Minister of Kenya ; Prime Minister Modi also mentioned

    आयुर्वेदामुळे परतली केनियाच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीची दृष्टी ; पंतप्रधान मोदींनीही केला उल्लेख

    विशेष प्रतिनिधी

    गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील गांधीनगर येथे एका कार्यक्रमात केनियाचे माजी पंतप्रधान रायला ओडिंगा यांची मुलगी रोझमेरी ओडिंगा हिचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, रोझमेरीची कथा ही वस्तुस्थितीची साक्ष आहे की आयुर्वेदिक उपाय जागतिक स्तरावर प्रभावी आहेत. रोझमेरीनेही हरवलेली दृष्टी परत मिळवण्याचे श्रेय आयुर्वेदाला दिले. Ayurveda brings back the vision of the daughter of the former Prime Minister of Kenya ; Prime Minister Modi also mentioned

    केरळमधील रुग्णालयात रोझमेरीवर आयुर्वेदिक उपचार झाले. मेंदूतील एन्युरिझम (नसा कमजोर होणे) आणि ऑप्टिकल नर्व्हमध्ये ऍट्रोफी (स्नायू अरुंद होणे) यामुळे तिची दृष्टी गेली. ती म्हणाली, ‘मला वाटते की आयुषने भारताबाहेर, जगाच्या इतर कोणत्याही भागात कोणाची तरी मदत केली आहे याचा हा पुरावा आहे.’

    रोझमेरीनेही म्हणाली की, आयुष सोल्युशन्स ग्लोबल आहे यात शंका नाही आणि या कथेचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे.
    आयुष म्हणजे आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी असा अर्थ होतो. या पर्यायी औषधोपचार पद्धतीसाठी भारतात स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

    अनेक देश उपचारासाठी फिरले

    ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन समिटमध्ये सहभागी होण्यासाठी रोझमेरी गांधीनगरमध्ये आली होती. ती म्हणाली “2018 मध्ये, मला एन्यूरिझमची समस्या होती आणि यामुळे, माझी पाहण्याची क्षमता कमकुवत झाली. जर्मनी, जपान आणि दक्षिण आफ्रिकेतही मी उपचारासाठी गेले होते. दोनदा चीनला गेले होते. तिथे तिच्यावर एक्यूपंक्चरने उपचार करण्यात आले. मात्र, सर्वत्र हातपाय मारूनही यश मिळत नव्हते. ”

    रोझमेरी ओडिंगा यांचे कुटुंब भारतात आले. केरळमधील एर्नाकुलम येथील श्रीधरियम आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय आणि संशोधन केंद्रात रोझमेरीच्या डोळ्यांवर उपचार सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू झाले. येथे प्रत्येकी तीन आठवड्यांच्या दोन सत्रात तिच्यावर उपचार करण्यात आले आणि उपचार सुरूच राहिले.

    आयुर्वेदिक उपचारांचा परिणाम पहिल्या सत्रानंतरच दिसून आला

    रोझमेरीवर उपचार करणारे रुग्णालयाचे मुख्य फिजिशियन डॉ. नारायणन नंबूथिरी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी रोझमेरी आमच्याकडे आली तेव्हा तिला काहीच दिसत नव्हते. तिला प्रकाशाची थोडीशी कल्पना येत होती पण दिसण्यात अजिबात स्पष्टता नव्हती. इतर देशांमध्ये विविध उपचार घेतल्यानंतर ती आमच्याकडे आली.

    नारायणन यांनी रुग्णालयात शुद्ध आयुर्वेदिक उपचार दिले तसेच यामध्ये अंतर्भूत औषधांसह इतर उपचार पद्धतींचा वापर करण्यात आला. तिला ‘तेल धारा’ हा विशेष मसाज देण्यात आला जो डोळ्याभोवती आणि डोक्याभोवती केला जातो. उपचाराचा परिणाम पहिल्या सत्रानंतरच दिसत होता आणि आता उपचार पूर्ण झाल्यानंतर ती स्पष्टपणे पाहू शकते.

    उपचार करणाऱ्या डॉक्टरांना बघून ही दिली रोझमेरीने प्रतिक्रिया

    येथेच रोझमेरीची डॉ. नंबूथिरीशी भेट झाली आणि यावेळी तिचा आनंद स्पष्ट दिसत होता. रोझमेरी म्हणाली, ‘जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी त्यांना पाहू शकले नाही. मला फक्त त्यांचा आवाज ऐकू येत होता. पण आज मी त्यांना पाहू शकले. केनियाच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीवर झालेल्या या यशस्वी उपचारामुळे आयुर्वेदाची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे.

    त्याचवेळी, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात रोझमेरीच्या कथेचा उल्लेख केला. ते म्हणाले की मी एकदा नवी दिल्लीत रायला ओडिंगा यांना भेटलो होतो. त्यांनी मला त्यांच्या मुलीच्या स्थितीबद्दल आणि आयुर्वेदिक उपचारांमुळे तिची दृष्टी परत मिळविण्यासाठी कशी मदत होत आहे याबद्दल माहिती दिली.

    Ayurveda brings back the vision of the daughter of the former Prime Minister of Kenya ; Prime Minister Modi also mentioned

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य