विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतर आता तो क्षण नजीक आला असून, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीरामलांच्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवली आणि कोट्यावधी रामभक्त धन्य झाले. Ayodhya Shri Ram became distinguished
प्रभू श्रीराम यांच्या नगरीमध्ये अर्थात अयोध्येमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण राममय झालं असून, तिथं कणाकणात रामाचा वावर जाणवत आहे. निमित्त आहे ते म्हणजे बहुप्रतिक्षित राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे.
सोमवारी, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत झाली आहे. अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात दीपोत्सवही साजरा केला जात आहे.
रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान होताच मूर्तीकार म्हणतात…
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर परिसरात दाखल झालेल्या योगीराज यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, ‘सध्या मला मी स्वत: या विश्वातील सर्वात नशिबवान व्यक्ती असल्यासारखं वाटत आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या पूर्वजांचा, माझ्या कुटुंबीयांचा आशीर्वाद मिळाला आहे. रामलल्लांची मूर्ती साकारल्याचं वास्तव पाहतो तेव्हा मला मी स्वप्ननगरीतच असल्याचा भास होतो.’
थेट प्रक्षेपणावर बंदी घालता येणार नाही
फक्त इतर समुदायाचे लोक एखाद्या परिसरात राहतात म्हणून तिथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यावर निर्बंध घालता येणार नाहीत असे थेट आदेश सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकारला दिले आहेत. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.
सरसंघचालक अयोध्येत
सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी उपस्थितांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. साऊथ सुपरस्टार रजनीकांतही अयोध्येत दाखल झाले. रजनीकांत यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय.
हिंदी कलाजगतातील महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन अयोध्येत दाखल झाले असून, त्यांनी उपस्थितांची भेट घेत त्यांना अभिवादन केलं.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावेळी गर्भगृहात
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
आनंदीबेन पटेल, राज्यपाल, उत्तर प्रदेश
मोहन भागवत, सरसंघचालक
आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी आहेत.
अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरु असताना दुसरीकडे शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येत जवळपास 15 हजार पोलीस आणि सुरक्षाबल तैनात करण्यात आले आहेत.. तर लता मंगेशकर चौकात रॅपिड अॅक्शन फोर्स सज्ज ठेवण्यात आलंय.. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत सुरक्षा कठोर करण्यात आली आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाची अनुपस्थिती?
राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती असतानाच काही महत्त्वाची नावं मात्र या सोहळ्यासाठी अनुपस्थित असणार आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ट अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार अमित शाह 25 जानेवारी रोजी अयोध्येला भेट देतील.
Ayodhya Shri Ram became distinguished
महत्वाच्या बातम्या
- राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, महात्मा गांधींचा केला उल्लेख
- पश्चिम महाराष्ट्रातला “राम संपर्काचा” आकडा खरे तर पवार गटाला धडकी भरवणारा, पण तो गट नुसताच वाजवतोय तोंडाचा बेंडबाजा!!
- रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे मुख्य यजमान अयोध्येला कधी पोहोचणार, अयोध्येत किती वेळ घालवणार, जाणून घ्या पीएम मोदींचे शेड्युल
- अयोध्येत सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त, 10 हजार CCTVची नजर, 31 IPS आणि 25 हजार जवान तैनात