• Download App
    Shubhanshu Shukla अ‍ॅक्सिओम-४ मिशन: अंतराळात जाण्यापूर्वी शुभांशू

    Shubhanshu Shukla : अ‍ॅक्सिओम-४ मिशन: अंतराळात जाण्यापूर्वी शुभांशू शुक्लाने पत्नीसाठी लिहिला एक भावनिक संदेश

    Shubhanshu Shukla

    ‘जबाबदारी आणि नाते…’ जाणून घ्या, नेमकं काय म्हटलं आहे शुभांशू शुक्लाने


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – Shubhanshu Shukla भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ल अ‍ॅक्सिओम-४ मिशनवर जात आहेत. शुभांशू यांची चर्चा देशासह जगभरात होत आहे. त्यांच्या कुटुंबाने या मोहिमेबद्दल खूप आनंद व्यक्त केला आहे. त्याच वेळी, शुभांशू यांनी अंतराळात जाण्यापूर्वी पत्नी कामना शुक्ला यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला. त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत आणि सर्वांचे आभारही मानले आहेत.Shubhanshu Shukla

    शुभांशू यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, २५ तारखेला सकाळी लवकर या ग्रहावरून निघण्याची योजना आखली असल्याने मी मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व लोकांचे आभार मानतो. तसेच घरातील सर्व लोकांचे त्यांच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आभार मानतो. एक उत्तम साथीदार असल्याबद्दल पत्नी कामनाचे विशेष आभार. तुझ्याशिवा हे शक्य नव्हते. खरंत कोणताही माणूस एकटा अंतराळात प्रवास करत नाही. आम्ही हे अनेक लोकांच्या सहकार्याने त्यांच्या खांद्यावर बसून करतो आहोत. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.



    शुभांशू शुक्लाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे, त्याच्यामुळे आज आमची छाती अभिमानाने भरून आली आहे. शुभांशू यांचे वडील म्हणाले, “मी माझ्या मुलाला शुभेच्छा देतो. आज माझा मुलगा एका मोहिमेवर जात आहे. तो ज्या मोहिमेसह जात आहे ती पूर्ण व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो. माझ्या मुलाचे ध्येय नक्कीच पूर्ण होईल असा मला पूर्ण विश्वास आहे.”

    त्याच वेळी, शुभांशू शुक्लांच्या आई म्हणाल्या, “आज मी खूप आनंदी आहे. मी माझा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्ही सर्वजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. माझ्या मुलाची उड्डाण करण्याची वेळ आली आहे. सर्वजण माझ्या मुलाला शुभेच्छा देत आहेत.”

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IndiGo : अहमदाबाद विमानतळावर इंडिगोचे आपत्कालीन लँडिंग; कुवैतहून दिल्लीला येणाऱ्या विमानात टिश्यू पेपरवर हायजॅक व बॉम्ब असल्याची धमकी मिळाली

    LNG-Powered Train : देशातील पहिली एलएनजी ट्रेन धावण्यासाठी सज्ज; एकदा टाकी पूर्ण भरल्यावर 2200 किलोमीटरपर्यंत धावेल, डिझेलच्या तुलनेत तीनपट खर्च कमी

    Chief Punit Garg : RCOM चे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना अटक; ईडीने 40 हजार कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी अटक केली; फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप