• Download App
    लिबरल्सना राहुल गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण; बॉलिवूड पासून दूर पूजा भट्ट भारत जोडो यात्रेत सामील Away from Bollywood, Pooja Bhatt joins Bharat Jodo Yatra

    लिबरल्सना राहुल गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण; बॉलिवूड पासून दूर पूजा भट्ट भारत जोडो यात्रेत सामील

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : बॉलिवूड मध्ये कार्यरत महेश भट्ट आणि त्यांच्या फॅमिलीचे लिबरल्सशी असलेले नाते सर्वश्रुत आहे. या सर्व लिबरल्सना सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे प्रचंड आकर्षण वाटू लागले आहे. या आकर्षणातूनच बॉलीवूड पासून बराच काळ दूर राहिलेली अभिनेत्री पूजा भट्ट या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाली आहे. Away from Bollywood, Pooja Bhatt joins Bharat Jodo Yatra

    राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. काल सायंकाळी हैदराबाद मध्ये घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर शरसंधान साधले. त्यांच्यात राजकीय साटेलोटे असल्याचा आरोप केला. आज सकाळी त्यांनी भारत जोडो यात्रेची पुढची वाटचाल सुरू केली. या वाटचालीतच अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधी यांच्या बरोबर चालत सामील झाली.

    भारत जोडो यात्रेमध्ये लिबरल्स मोठ्या प्रमाणावर सामील होताना दिसत आहेत. स्वराज चळवळीचे नेते आणि माजी पत्रकार योगेंद्र यादव हे अधून मधून भारत जोडो यात्रेत दिसतात. भारत जोडो यात्रेची सुरुवात कन्याकुमारीतून झाली, तेव्हा आणि केरळमध्ये देखील त्यांचा यात्रेत समावेश होता. दरम्यानच्या काळात ते यात्रेत दिसले नाहीत. मात्र आज या लिबरल्स पैकी अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधीं समावेत भारत जोडो यात्रेत सामील झाली.

    Away from Bollywood, Pooja Bhatt joins Bharat Jodo Yatra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट