• Download App
    दोन रेल्वे गाड्यांची टक्कर टळणार; स्वदेशी स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली 'कवचची चाचणी । Avoid collision of two trains; Indigenous Automated Railway Protection System kawach Tested

    दोन रेल्वे गाड्यांची टक्कर टळणार; स्वदेशी स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली ‘कवचची चाचणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दोन रेल्वेगाड्या समोरासमोर आल्या तरी आता त्यांच्यामध्ये टक्कर होणार नाही. कारण स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली ‘कवच’ची चाचणी यशस्वी झाली आहे. Avoid collision of two trains; Indigenous Automated Railway Protection System kawach Tested

    सिकंदराबादमध्ये एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर पूर्ण वेगाने आणून स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली प्रतिकूल परिस्थितीत गाड्यांची टक्कर थांबवू शकते का? याची यशस्वी चाचणी केली. रेल्वे मंत्रालयाने या चाचणीचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.



    स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच’ हे रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशने भारतीय उद्योगाच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे तंत्र इतकं अचूक आहे की, भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन गाड्या समोरासमोर आल्या तरी त्यांची टक्कर होणार नाही.

    रेड सिग्नल ओलांडताच रेल्वेला आपोआप ब्रेक लागेल. यावेळी मागूनही एखादी रेल्वे येत असेल तर ती आपोआप थांबेल. रेल्वे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असेल तरीही दुसरी रेल्वे समोर आल्यानंतर आपोआप ब्रेक लावला जाईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे.

    Avoid collision of two trains; Indigenous Automated Railway Protection System kawach Tested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना अमित शाहांनी लोकसभेत वाचून दाखविली भाजप हरल्याची यादी!!

    Anmol Ambani : अनिल अंबानींनंतर मुलगा अनमोलवर FIR; युनियन बँकेकडून ₹228 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

    India Aging : 2036 पर्यंत प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल; केंद्रीय मंत्री म्हणाले- लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे