विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यात मोदी सरकार यशस्वी होत असून हा विश्वास असल्याने वाहन उद्योगात तेजीचे वारे वाहू लागले आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४२ टक्के वाढ झाली आहे.Automotive industry flourishing, 42 per cent increase in passenger vehicle sales
फेडरेशन ऑ फ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन्सच्या (फाडा) वतीने जारी करण्यात आलेल्या जुलैमध्ये प्रवासी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये प्रवासी वाहनांची शोरूम विक्री ४२.१४ वाढून २,६१,७४४ वाहनांवर गेली. जूनमध्ये ती १८४,१३४ वाहने इतकी होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दिल्ली, हरियाणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या सरकारने कडक लॉकडाऊन सदृश उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे वाहन उद्योग धास्तावला होता. कडक निबंर्धांमुळे वाहनांची विक्री ठप्प झाली होती. अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद केले होते. बजाज ऑटोने मर्यादित क्षमतेसह उत्पादन सुरू ठेवले होते.
आता भारतातील कोविड संसर्ग कमालीचा घसरल्यामुळे सर्व बाजार सुरू झाले आहेत.मार्च व मे २०२० मध्ये देशातील बहुतांश वाहन प्रकल्प बंद होते. काही ठिकाणी तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्पादन बंद होते.
फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, बहुतांश राज्यांनी जूनमध्ये कोविड निर्बंध शिथिल केले. त्यामुळे जुलैमध्ये विक्रीत वाढ झाली. सर्वच श्रेणीतील वाहनांची विक्री वाढली असली तरी प्रवासी वाहनांच्या विक्रीचा आलेख सर्वाधिक उंच राहिला. कोविडकाळात बंधनकारक ठरलेले सामाजिक अंतर आणि कौटुंबिक सुरक्षेला आलेले महत्त्व यामुळे लोक वैयक्तिक वाहन खरेदीस प्राधान्य देत आहेत.
Automotive industry flourishing, 42 per cent increase in passenger vehicle sales
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध
- ओबीसी आरक्षण विधेयक : राज्यसभेतही विधेयक मंजूर झाल्याने फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदी आणि संसद सदस्यांचे आभार