• Download App
    Australian युद्धाभ्यासासाठी ऑस्ट्रेलियाची लढाऊ

    Australian : युद्धाभ्यासासाठी ऑस्ट्रेलियाची लढाऊ विमानं प्रथमच भारतात दाखल!

    Australian

    ‘तरंग शक्ती’चा दुसरा टप्पा जोधपूरमध्ये 13 पर्यंत चालणार आहे.


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : हवाई दलाच्या ‘तरंग शक्ती-2024’ सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या  ( Australian  ) रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाने प्रथमच आपली लढाऊ विमाने भारतात पाठवली आहेत.

    ऑस्ट्रेलियन स्क्वॉड्रनमधून तीन EA 18G ग्रोव्हर विमाने, 120 एअरमन आणि इतर कर्मचारी जोधपूरला पाठवण्यात आले आहेत. देशातील सर्वात मोठ्या बहुपक्षीय हवाई सरावाचा दुसरा टप्पा 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान एअर फोर्स स्टेशन जोधपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.



    भारताबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, श्रीलंका, यूएई, जपान आणि सिंगापूर हे देश यात सहभागी होत आहेत. मंगळवारी, अमेरिकेच्या सुखोई 30 SKI सह A10 आणि तेजससह ऑस्ट्रेलियाच्या EA 18 ने आपले कौशल्य दाखवले.

    ऑस्ट्रेलियन संरक्षण विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, रॉयल ऑस्ट्रेलियन वायुसेनेने ‘तरंग शक्ती’ या सरावात सहभागी होण्यासाठी लढाऊ विमानांची पहिली तैनाती भारतात केली आहे.

    Australian fighter aircraft entered India for the first time for maneuvers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!