विशेष प्रतिनिधी
मथुरा : काशीमधील ज्ञानवापीतील सत्य आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात ASI ने प्रत्यक्ष सर्वेक्षणातून बाहेर आणले. त्यानंतर आता मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भात देखील असेच सत्य बाहेर आले आहे. औरंगजेबाने मथुरेतले कटरा केशवदेव मंदिर पाडूनच तिथे मशीद बांधली, असा स्पष्ट खुलासा आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात ASI ने एका माहिती अधिकारातील खटल्यात केला आहे. Aurangzeb built the mosque after demolishing the Keshavdev temple in Mathura
मैनपुरी येथील नागरिक अजय प्रताप सिंह यांनी देशभरातील मंदिरांच्या वास्तविक माहितीसाठी माहिती अधिकाराचा वापर करून आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला काही प्रश्न विचारले. त्यामध्ये मथुरे येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात ASI ने औरंगजेबाने कटरा केशवदेव मंदिर पाडूनच त्या भूमीवर मशीद उभारली, असे उत्तर दिले. त्यासाठी ASI ने ब्रिटिशकालीन 1920 च्या गॅझेटचा हवाला दिला. या गॅझेटमध्ये कटरा केशव देव मंदिराचा उल्लेख असून ते मंदिर पाडूनच तिथे मशीद उभी केल्याचा स्पष्ट पुरावा आहे.
तत्कालीन अलाहाबाद म्हणजे सध्याच्या प्रयागराज मधून प्रकाशित झालेल्या 1920 च्या गॅझेटमध्ये उत्तर प्रदेश मधल्या 39 स्मारकांची माहिती दिली आहे. यामध्ये 37 व्या स्मारकाचा म्हणजेच श्रीकृष्ण जन्मभूमी कटरा केशवदेव मंदिराचा उल्लेख आहे हे मंदिर पाडून त्या भूमीवर औरंगजेबाने मशीद बांधली असे गॅझेट मध्ये नमूद केले आहे. उल्लेखाच्या आधारे आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ASI ने अजय प्रताप सिंह यांना उत्तर पाठविले आहे.
ASI ने श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भात दिलेले उत्तर अलाहाबाद हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असे श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाचे अध्यक्ष एडवोकेट महेंद्र प्रताप यांनी सांगितले. यामुळे आता ज्ञानवापी पाठोपाठ श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
Aurangzeb built the mosque after demolishing the Keshavdev temple in Mathura
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!