• Download App
    आंग सान स्यू की म्यानमार तुरुंगातून बाहेर; लष्कराने अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले, तुरुंगातील उष्णतेचे दिले कारण|Aung San Suu Kyi out of Myanmar prison; The military detained him at an undisclosed location, citing the heat of the prison

    आंग सान स्यू की म्यानमार तुरुंगातून बाहेर; लष्कराने अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले, तुरुंगातील उष्णतेचे दिले कारण

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : म्यानमार लष्कराने आँग सान स्यू की आणि माजी राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांना तुरुंगातून बाहेर काढून नजरकैदेत ठेवले आहे. लष्कराने सांगितले की, देशातील तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट पाहता दोन्ही नेत्यांची तुरुंगातून सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Aung San Suu Kyi out of Myanmar prison; The military detained him at an undisclosed location, citing the heat of the prison

    मात्र, त्यांना कुठे ठेवले होते, हे लष्कराने सांगितले नाही. म्यानमारमध्ये उष्णतेमुळे तापमान 39 अंशांवर पोहोचले आहे. त्याचवेळी, आंग सान यांच्या वकिलाने इंग्रजी वृत्तपत्र द गार्डियनला सांगितले आहे की, कोणालाही त्यांना भेटू दिले जात नाही. त्या आजारी आहेत, काहीही खाऊ शकत नाहीत.



    लष्कराने 10 वर्षांपूर्वी सत्तापालट केला

    म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्कराने सत्तापालट केला. यानंतर राज्य समुपदेशक आंग सान स्यू की आणि राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्यावर डझनाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील अनेक प्रकरणांमध्ये त्यांना शिक्षाही झाली आहे.

    त्या सध्या राजधानी नपिटामध्ये 27 वर्षांची शिक्षा भोगत आहेत. यानंतर लष्करी नेते जनरल मिन आंग हलाईंग यांनी स्वत:ला देशाचे पंतप्रधान घोषित केले. लष्कराने देशात 2 वर्षांची आणीबाणी जाहीर केली होती. मात्र, नंतर त्यात वाढ करण्यात आली.

    वास्तविक, म्यानमारमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यापैकी आँग सान स्यू की यांच्या पक्षाने दोन्ही सभागृहात 396 जागा जिंकल्या. तर विरोधी युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टीला दोन्ही सभागृहात केवळ 33 जागा मिळाल्या. या पक्षाला लष्कराचा पाठिंबा होता.

    निकाल आल्यानंतर लष्कराने त्यावर प्रश्न उपस्थित केले. सैन्याने सू की यांच्या पक्षावर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. निवडणूक निकालानंतर सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद सुरू झाले, त्यानंतर लष्कराने सत्तापालट केला.

    पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, म्यानमारमध्ये 2021 मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर लष्कराने 6000 लोक मारले आहेत. म्यानमार आपल्या विरोधकांना सातत्याने मृत्यूदंडाचीही शिक्षा देत आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, म्यानमारमध्ये हवाई हल्ले ही रोजची गोष्ट बनत चालली आहे. आपल्या विरोधकांना शोधण्यात लष्कर कोणतीही कसर सोडत नाही. यामुळे ते सर्वसामान्यांना टार्गेट करत आहेत.

    Aung San Suu Kyi out of Myanmar prison; The military detained him at an undisclosed location, citing the heat of the prison

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!