वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 40 व्या फेरीनंतर 5G Spectrum चा लिलाव अखेर सोमवारी संपुष्टात आला आहे. 5G स्पेक्ट्रममधून आता केंद्र सरकारला तब्बल 1.50 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांनी या लिलावात बाजी मारली असून आता संपूर्ण देशात एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्या 5जी चे जाळे पसरवणार आहेत. Auction complete, Reliance Jio, Airtel companies bid
या कंपन्या पसरवणार जाळे
गेल्या 7 दिवसांपासून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होता. या लिलावातून सरकारला 1.50 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्या देशभरात 5 जी चे जाळे पसरवणार असून वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांकडून मोजक्या क्षेत्रातच लिलावाला पसंती देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत या 5G विस्तारासाठीच्या अलॉटमेंट करण्यात येणार आहेत.
कधीपर्यंत सुरू होणार सेवा?
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता या लिलावानंतर 5G साठी जोमाने कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Spectrum auctions
2014 : 60,677
2015 : 1,09,227
2016 : 65,789
2021 : 77,821
2022 : 1,50,000 कोटी + & counting.
(सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये)
Auction complete, Reliance Jio, Airtel companies bid
महत्वाच्या बातम्या
- ज्ञानवापी खटल्यातील मुस्लिम पक्षकारांचे वकील अभयनाथ यादव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- ओवैसींनी वर्तवले भविष्य : कदाचित एखाद्या दिवशी श्रीलंकेसारखेच लोकं पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसतील, लोकशाहीत विश्वास संपलाय!
- राष्ट्रकुलमध्ये भारताला तीन सुवर्ण : 19 वर्षीय जेरेमी आणि 20 वर्षीय अचिंताने भारताला मिळवून दिले सुवर्णपदक