• Download App
    गुजरात हायकोर्टात सुनावणी सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न, आरोपींना जामीन मिळताच, पती-पत्नीसह चौघांशी प्यायले फिनाइल|Attempted suicide while hearing in Gujarat High Court, as soon as accused got bail, husband and wife drank phenyl with four

    गुजरात हायकोर्टात सुनावणी सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न, आरोपींना जामीन मिळताच, पती-पत्नीसह चौघांशी प्यायले फिनाइल

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सुनावणीदरम्यान एका जोडप्यासह चौघांनी फिनाइलचे प्राशन केले. सर्वांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.Attempted suicide while hearing in Gujarat High Court, as soon as accused got bail, husband and wife drank phenyl with four

    सोला पोलिस स्टेशनचे पीआय जिग्नेश अग्रवाल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणारे चारही पीडित तक्रारदार आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या 4 तक्रारदारांनी कोर्टातच फिनाइल प्राशन केले. पोलिसांच्या पथकाने चौघांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले.



    आरोपींना जामीन मिळाल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

    पीआय जिग्नेश अग्रवाल यांनी सांगितले की, या कुटुंबाने बँकेतून कर्ज घेतले होते. परंतु, त्यांच्या कर्जाची रक्कम मध्यस्थांनी बळकावली. याप्रकरणी कुटुंबीयांनी आनंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केल्याने कुटुंबातील चौघांनी फिनाइल प्यायले. हे चौघेही सोबत फिनाइलची बाटली घेऊन कोर्टात आले होते.

    Attempted suicide while hearing in Gujarat High Court, as soon as accused got bail, husband and wife drank phenyl with four

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Supreme Court : परमिट मार्गाबाहेर अपघात झाल्यास देखील भरपाई; 11 वर्षे जुन्या खटल्याचा निकाल, कर्नाटक विमा कंपनीला पीडितेला पैसे देण्याचे आदेश

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- तपास यंत्रणा वकिलांना नोटीस पाठवू शकत नाही; SPची परवानगी आवश्यक; मनी लाँड्रिंग प्रकरणात EDच्या वकिलांना समन्स बजावले होते

    Arvind Kejriwal : गुजरातमध्ये आपची किसान महापंचायत; केजरीवाल म्हणाले- पोलिस हटवले तर गुजरातचे शेतकरी भाजपवाल्यांना पळवून-पळवून मारतील