• Download App
    गोव्याचा वापर राजकीय प्रयोगशाळेप्रमाणे करण्याचा प्रयत्न गोवेकरच हाणून पाडतील, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका|Attempt to use Goa as a political laboratory will Govekars thwart , criticizes Chief Minister Pramod Sawant

    गोव्याचा वापर राजकीय प्रयोगशाळेप्रमाणे करण्याचा प्रयत्न गोवेकरच हाणून पाडतील, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    गोवा: गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा वापर काही पक्ष राजकीय प्रयोगशाळा म्हणून करत आहेत. मात्र, राज्यातील राज्यातील मतदार या बाहेरच्या पक्षांना घुसखोरी करण्याची परवानगी देणार नाहीत, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुनावले आहे.Attempt to use Goa as a political laboratory will Govekars thwart , criticizes Chief Minister Pramod Sawant

    गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि तृणमूल कॉँग्रेस गोवा विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. मात्र, सावंत यांनी त्यास विरोध केला आहे. गोव्याचा वापर आपल्या राजकीय प्रयोगासाठी लॅबप्रमाणे करावा, या सगळ्या प्रकाराला गोवेकर नक्कीच नाकारतील, असे त्यांनी म्हटले आहे.



    सावंत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावरही हल्लाबोल करताना म्हटले आहे की, या बाहेरुन आलेल्या पक्षांशी समझौता करत या पक्षाने आपल्या मूल्यांसोबत प्रतारणा केली आहे.

    महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आगामी निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षासोबत युती केली आहे. तृणमूल काँग्रेसप्रमाणेच गोव्यात घर करु पाहणारा आम आदमी पक्षही सध्या राज्यात हालचाली करताना दिसून येतो आहे.

    Attempt to use Goa as a political laboratory will Govekars thwart , criticizes Chief Minister Pramod Sawant

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची