विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या बंगल्यात कार घेऊन जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. Attempt to enter Ajit Doval’s bungalow by car
बुधवारी सकाळी एका व्यक्तीन अजित डोवाल यांच्या घरात जबरदस्तीने कार घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. आधीच सतर्क असलेल्या सुरक्षदलाच्या जवानांनी त्याला गेटवरच पकडले. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल त्याची चौकशी करत आहे.
अजित डोवाल हे नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.