• Download App
    केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, लखीमपूर खेरी हिंसचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी|Attempt to blackmail Union Home Minister, threat to make Lakhimpur Kheri violence video viral

    केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, लखीमपूर खेरी हिंसचाराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडीओ आपल्याकडे असून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.Attempt to blackmail Union Home Minister, threat to make Lakhimpur Kheri violence video viral

    पोलीसांनी याप्रकरणी चौघा तरुणांना अटक केली आहे. मंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांच्या कर्मचाºयांनी याबाबत तक्रार दिली आहे.चौघेही उच्चशिक्षित आहेत. कबीर कुमार, अमित शर्मा, अमित कुमार, निशांत कुमार आणि अश्विनी कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.



    त्यापैकी दोन जण पदवीचे शिक्षण घेत आहेत. दुसरे दोघे एका खासगी कंपनीत काम करत आहेत. लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या संपूर्ण घटनेची बातमी पाहिल्यानंतर त्यांनी टेनी यांना ब्लॅकमेल करण्याचा डाव आखला. शेतकºयांच्या मोर्चावर गाडी घातल्याप्रकरणी टेनी यांचा मुलगा अटकेत आहे.

    यामध्ये चार शेतकर्‍यासह आठ जण ठार झाले होते. 3 आॅक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेशी संबंधित व्हिडीओ आपल्याकडे आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा यांच्या कर्मचार्‍यांकडून त्यांना तक्रार मिळाली होती की

    अज्ञात व्यक्तींकडून या घटनेशी संबंधित व्हिडिओ जारी करण्याची किंवा प्रकरण मिटवण्यासाठी अडीच कोटी रुपये देण्याची धमकी देणारा फोन आला होता. तक्रारीनंतर नवी दिल्ली जिल्ह्यातील नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला.

    तपासादरम्यान पोलिसांना आढळले की व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे कॉल केले गेले होते. सायबर विभागाच्या सहकार्याने पोलिसांनी चार आरोपींना नोएडातून आणि एकाला दिल्लीतून अटक केली.

    Attempt to blackmail Union Home Minister, threat to make Lakhimpur Kheri violence video viral

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Rahul Gandhi : बजेट 2026- राहुल म्हणाले- युवकांना काहीच मिळाले नाह, :ममता बॅनर्जींनी म्हटले- विस्कळीत अर्थसंकल्प

    Budget 2026 : भारताने बांगलादेशची मदत अर्ध्यावर आणली; मालदीव-म्यानमारचा निधीही कमी केला; भूतानसाठी वाढवून ₹2,288 कोटी केले

    Budget 2026 : बजेट 2026, स्वस्त-महाग- कर्करोगाची 17 औषधे स्वस्त; EV, सौर पॅनेलचे दर कमी होतील