• Download App
    सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला ; राकेश कपिलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखलAttack on Salman Khurshid's house in Nainital; A case has been registered against 20 persons including Rakesh Kapil

    सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला ; राकेश कपिलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल

    हल्ला करण्यास आलेल्या जमावाच्या हातात भाजपचा झेंडा होता. या हल्ल्यानंतर खुर्शीद यांनी आपण काही चुकीचे म्हटंल होतं का, असा सवाल केला आहे.Attack on Salman Khurshid’s house in Nainital; A case has been registered against 20 persons including Rakesh Kapil


    विशेष प्रतिनिधी

    नैनिताल : काँग्रेस नेता आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला करण्यात आला. खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी राकेश कपिलसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.हल्ला करण्यास आलेल्या जमावाच्या हातात भाजपचा झेंडा होता. या हल्ल्यानंतर खुर्शीद यांनी आपण काही चुकीचे म्हटंल होतं का, असा सवाल केला आहे.



    नेमक काय आहे हल्ला करण्याचं कारण

    सध्या सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून मोठा वाद सुरू झालेला आहे. या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा आयसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

    दरम्यान सलमान खुर्शीद यांनी या वादावर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, “मी (माझ्या पुस्तकात) असे म्हटले आहे की जे लोक अशा गोष्टी करतात ते हिंदू धर्माचे नाहीत. हिंदू धर्म हा एक सुंदर धर्म आहे ज्याने या देशाला एक विलक्षण संस्कृती दिली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हा हल्ला माझ्यावर नाही तर हिंदू धर्मावर आहे.” असं काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे.

    Attack on Salman Khurshid’s house in Nainital; A case has been registered against 20 persons including Rakesh Kapil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Economy : 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट वाढेल:अहवालात दावा- 21 वर्षांत दरडोई उत्पन्न ₹2.5 लाखांवरून वाढून ₹13.5 लाख होईल

    India Pakistan : भारत-पाकिस्तानने एकमेकांना अणु ठिकाणांची माहिती दिली; 35 वर्षांची जुनी परंपरा; ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ल्याची अफवा

    Indore : पाईपलाईनमधील गळतीमुळे दूषित पाणी; इंदूरमध्ये घातक जिवाणूमुळे 15 लोकांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाने अहवाल मागवला