• Download App
    PFI च्या गुप्त बैठका घेणाऱ्या म्होरक्यासह तिघांना एटीएस कडून पनवेलमध्ये बेड्या ATS handcuffs 3 in Panvel with leader holding secret meetings of PFI

    PFI च्या गुप्त बैठका घेणाऱ्या म्होरक्यासह तिघांना एटीएस कडून पनवेलमध्ये बेड्या

    वृत्तसंस्था

    मुंबई : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यासह तिघांना पनवेल येथून एटीएसने अटक केली आहे. या तिघांपैकी एक जण पीएफआय या संघटनेचा सेक्रेटरी असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.
    ATS handcuffs 3 in Panvel with leader holding secret meetings of PFI

    ‘देशातील दहशतवादी कारवायांमध्ये कथितपणे सहभागी असल्याच्या कारणावरून एनआयए ने पीएफआय विरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून सप्टेंबरमध्ये १५ राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून १०० हून अधिक पीएफआयचे नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती.  नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन, रिहॅब इंडिया फाऊंडेशन आणि ऑल इंडिया इमाम्स कौन्सिलसह पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्या संलग्न संघटनांवर केंद्र सरकारने दहशतवादात सहभाग असल्याच्या संशयावरून ५ वर्षांसाठी बंदी घातली. महाराष्ट्र एटीएसने राज्यातील अनेक जिल्ह्यात छापे मारी करून पीएफआयच्या अनेक पदाधिकारी आणि सदस्यांना अटक केली होती.

    देशविरोधी कट आखण्यासाठी बैठका

    बंदी घालण्यात आलेल्या पीएफआयचा हा पदाधिकारी आणि काही सदस्य पनवेल या ठिकाणी गुप्त बैठका घेत असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. या महितीच्या आधारे, एटीएसने बुधवारी पनवेल येथून पीएफआय संघटनेचा स्टेट एक्सपान्शन कमिटीचा सदस्य आणि पनवेल शहर सेक्रेटरी असे एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे बंदी घालण्यात आलेल्या पीएफआयच्या पदाधिकारी आणि सदस्य यांना एकत्रित करून देशविरोधी कारवाई करण्याचा कट करण्यासाठी बैठका घेत होते, अशी माहिती समोर येत आहे.

    ATS handcuffs 3 in Panvel with leader holding secret meetings of PFI

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!