• Download App
    Bangladeshi Hindus बांगलादेशात मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना:निष्पाप हिंदुंचा गुन्हा काय ???

    Bangladeshi Hindus बांगलादेशात मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना:निष्पाप हिंदुंचा गुन्हा काय ???

    स्मिता बाळकृष्ण कुलकर्णी

    गेले अनेक महिने बांगलादेशात सुरू असलेल्या अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराच्या बातम्या, व्हिडिओ पाहताना अंगावर काटा येतोय. नेमके काय साध्य करायचे आहे या जमात ए इस्लामी संघटनेस, अजून किती हिंसाचार ?? ? Atrocities against Bangladeshi Hindus

    ▪️दुदैवाने ज्यावेळेस कुंपणच शेत खाण्यास सरसावते तेव्हा निर्माण होणारी स्थिती ही आज बांगलादेशात दिसत आहे. कोणत्याही हिंसाचाराला धर्म नसतो मात्र जेंव्हा एखादा धर्मांध समाज या गोष्टी घडवून आणण्यात पुढाकार घेत असतो तेव्हा फक्त एका विशिष्ट धर्माचा सर्वनाश होत नसतो तर, तेथील संपूर्ण समाज विनाशाकडे जात असतो. देशातील प्रत्येक देशवासियांची सुरक्षा संबंधित देशाचे नैतिकच नव्हे तर संविधानिक कर्तव्य असते. बांगलादेश हा इस्लाम प्रेशित देश असला तरी ‘धर्मनिरपेक्षता’ त्यांच्या राज्यकारभाच्या चौकटीतील प्रमुख तत्त्व आहे.

    ▪️फार वर्षापूर्वी ग्रामीण बँकेचे संस्थापक अध्यक्ष व बांगलादेशाचे विद्यमान सर्वेसर्वा यांची भेट व त्यांच्या कामाची माहिती घेण्याचा योग आला होता. दुर्बल, दुर्लक्षित, एकटया, विधवा, परित्यक्ता महिलांच्या उथ्थानाकरिता सुरू केलेले बचतगट व विकासाच्या प्रवाहात महिलांना सामील करण्याकरिता, ग्रामीण बँकेची स्थापना. हे देश बांधणी व देशाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक प्रगतीतील एक महत्वाचे काम त्यांच्या नेतृत्वात केले जात होते. मात्र या महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेस धर्मांधतेचे वलय नक्की नव्हते. ‘दारिद्रय व गरिबी’ या दोन शब्दांमध्ये बांगलादेशातील सर्व मातृशक्ती ओवली गेली होती. आज मात्र याच समाजवादी विचारसरणीतून इतके भयानक कार्य चालू आहे याचे दुःख वाटते.

    ▪️धर्मापलिकडे जाऊन देशहितासाठी झटणाऱ्या मातृशक्तीचे (कुटुंबांचे) वर्गीकरण करून त्यांना मृत्यूच्या दरीत ढकळण्याचा डाव मांडला जात आहे. सामुहिक बलात्कार, विनयभंग, हत्या, किती तरी अन्याय, अत्याचार या त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेतील भगिनी भोगत आहेत.

    ▪️भारत हिंदूंचे राष्ट्र आहे आणि म्हणूनच एखादया देशाला डिवचण्याकरिता त्यांच्या कुटुंबांना हिंसा घडवून मारणे, देशाबाहेर हाकलून देणे असे उद्योग आज राजरोसपणे बांगलादेशात सुरू आहेत. हिंदुंची देवस्थाने, संस्था, कुटुंबे व स्त्रीयांना संपूर्णपणे उध्वस्त करण्याचे षडयंत्र आज बांगलादेशात शिजत आहे. कोणताही देश अराजकता निर्माण करून प्रगती साधत नाही तर देशात निर्माण होणारी अराजकतेची मानसिकता त्या त्या वेळेस ठेचून काढत पुढे जात असतो.

    ▪️या देशात घडणाऱ्या अल्पसंख्याक कुटुंबांचे छळ हे भविष्यतील अनेक कौटुंबिक सामाजिक, राजकीय, आर्थिक व गुन्हेगारी वृत्तींस प्रोत्साहन देणाऱ्या समस्यांना जन्माला घालणार आहेत
    अर्थातच शेजारी देश असल्याने बांगलादेशात घडणाऱ्या सर्व वाईट गोष्टींचा परिणाम भारतीयांच्या समस्त हिंदू मानसिकतेवर होणार आहे. या हिंसेचे पडसाद भारतात दिसू लागल्यास अंतर्गत सुरक्षा व समाजस्वास्थ्य बाधित होणार आहे.

    ▪️तत्पर, सावध, सजग व्हायला हवे.
    मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना – हिंसाचारात होरपळून निघतात सर्व दुर्बल घटक …..त्यात निष्पाप हिंदुंचा गुन्हा काय ???

    स्मिता बाळकृष्ण कुलकर्णी
    (लेखिका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत)

    Atrocities against Bangladeshi Hindus

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!