संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती, जाणून घ्या, पंतप्रधान मोदी काय म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी सांगितले की, भारताची संरक्षण निर्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल १५ हजार ९२० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यांनी ही वाढ एक मोठी उपलब्धी असल्याचे वर्णन केले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये देशाने १२ हजार ८१४ कोटी रुपयांच्या संरक्षण वस्तूंची निर्यात केली. Atmanirbhar Defence Big growth in defense exports All time high reached in FY 2022 to 23
‘’आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीने १५ हजार ९२० कोटी रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. देशासाठी ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आपली संरक्षण निर्यात झपाट्याने वाढत राहील.’’ असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट, आता अल्पबचत योजनेवर मिळणार अधिक व्याज!
याशिवाय राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, भारताने २०२०-२१ मध्ये ८ हजार ४३४ कोटी रुपयांची, २०१९-२० मध्ये ९ हजार ११५ कोटी रुपयांची आणि २०१८-१९ मध्ये १० हजार ७४५ कोटी रुपयांची लष्करी उपकरणे निर्यात केली. तर, २०१७-१८ मध्ये ही रक्कम ४ हजार ६८२ कोटी रुपये आणि २०१६-१७ मध्ये १ हजार ५२१ कोटी रुपये होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया –
राजनाथ यांच्या ट्विटला टॅग करत पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “उत्कृष्ट! यावरून भारताची प्रतिभा आणि ‘मेक इन इंडिया’बद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसून येतो. गेल्या काही वर्षांत संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचे चांगले परिणाम मिळत असल्याचेही यावरून दिसून येते. आपले सरकार भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील.”
Atmanirbhar Defence Big growth in defense exports All time high reached in FY 2022 to 23
महत्वाच्या बातम्या
- नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांना सुखद धक्का, व्यायसायिक एलपीजी सिलिंडर 92रुपयांनी स्वस्त
- नाशिकमधले नवे वेदोक्त प्रकरण; सामाजिक वादाच्या ठिणगीला फुंकर आणि सावरकर गौरव यात्रेला काटशह देण्याचा हेतू?
- मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट, आता अल्पबचत योजनेवर मिळणार अधिक व्याज!
- बिहार : सासारामनंतर नालंदामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार; गोळीबारात तीन जण जखमी