विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत दोन्ही बाजूंनी महिला राज्य रेखा गुप्ताविरुद्ध आतिशी सामन्यासाठी विधानसभा सज्ज!!, असे राजकारण दिल्लीत घडले आहे. Atishi Marlena
दिल्लीत विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप मुख्यमंत्री पदावरच्या सगळ्या मोठ्या पुरुष दावेदारांना बाजूला काढून रेखा गुप्ता यांच्या रूपाने दिल्लीला चौथी महिला मुख्यमंत्री दिली. रेखा गुप्ता यांची राजवट सुरू झाली. त्यांच्या आधी आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी मार्लेना या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर होत्या.
पण आम आदमी पार्टी पराभूत झाल्यानंतर त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, पण त्या दिल्ली विधानसभेची निवडणूक झाडू चिन्हावरच जिंकल्या. त्यामुळे आम आदमी पार्टीने आता दिल्ली विधानसभेतले विरोधी पक्ष नेते पद आतिशी मार्लेना यांना द्यायचे ठरविले. त्यानुसार त्यांची विरोधी पक्ष नेते पदावर निवड देखील झाली. त्यामुळे दिल्लीमध्ये आता रेखा गुप्ताविरुद्ध आतिशी मार्लेना असा सामना विधानसभेत रंगणार आहे.
मुख्यमंत्रीपदी महिला आणि विरोधी पक्षनेते पदावर देखील महिलाच असा इतिहास आणि वर्तमान पहिल्यांदाच देशात घडले आहे. दिल्लीत खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूंनी महिलांचे राज्य सुरू झाले आहे.
Atishi Marlena chosen leader of the opposition in Delhi assembly
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक,केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आवाहन
- Bangladesh : बांगलादेशात अराजकता सुरूच, बीएनपी नेत्याची मारहाण करत हत्या!
- Madan Rathore : भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्ष पदावर मदन राठोड यांची बिनविरोध निवड!
- Gaza : गाझा पुननिर्माणासाठी अरब देशांचा पुढाकार, 5 वर्षांत विकसित करण्याचे उद्दिष्ट; सहा देश आले एकत्र