आप’चा अजेंडा काय असेल ते जाणून घ्या?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Atishi आतिशी यांची दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. रविवारी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अरविंद केजरीवाल, आतिशी सिंह, गोपाल राय हे देखील उपस्थित होते. आम आदमी पक्षाचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते.Atishi
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोपाल राय म्हणाले की, आतिशी या विरोधी पक्षनेत्या असतील. सर्व आमदारांनी त्यांना निवडून दिले आहे. आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्रीही राहिल्या आहेत. गोपाल राय म्हणाले की, आम आदमी पक्षाने केलेली जी कामं आहेत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागेल. तसेच भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण करून घेणे ही आमच्या विरोधी पक्षनेत्याची दुहेरी जबाबदारी असेल.
आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील जनतेने आम आदमी पक्षाला विरोधी पक्षाची भूमिका दिली आहे. मजबूत विरोधी पक्ष म्हणजे काय? हे कामामधून आम्ही दाखवू. मोदीजी म्हणाले होते की हे पहिल्या मंत्रिमंडळात मंजूर केले जाईल आणि ८ मार्च रोजी महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा केले जातील. हे आश्वासन पूर्ण करून घेणे हा आमचा अजेंडा असेल.
Atishi elected as Leader of Opposition Delhi Assembly session begins tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक,केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आवाहन
- Bangladesh : बांगलादेशात अराजकता सुरूच, बीएनपी नेत्याची मारहाण करत हत्या!
- Madan Rathore : भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्ष पदावर मदन राठोड यांची बिनविरोध निवड!
- Gaza : गाझा पुननिर्माणासाठी अरब देशांचा पुढाकार, 5 वर्षांत विकसित करण्याचे उद्दिष्ट; सहा देश आले एकत्र