विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन भावांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार विरुद्ध विरोधकांनी रान पेटवले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था, पोलीस यंत्रणांवर प्रचंड आगपाखडकडे केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यात आघाडीवर आहेत. अनेक लिबरल पत्रकार, विचारवंत त्यांना सामील आहेत. त्यांना काँग्रेससह बाकीच्या विरोधी पक्षांची देखील साथ मिळाली आहे. Atiq was to give information about the nexus of ISI-terrorist groups to the investigating agencies
अतीकच्या रूपाने उत्तर प्रदेशातील माफिया मारल्या गेल्यानंतर या सर्वांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर संतापून बोट ठेवले आहे. पण उत्तर प्रदेशात काल मारला गेलेला अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद हे दोघे लँड माफिया, गॅंगस्टर होते आणि त्यांच्यावर शेकडो अपराधांची नोंद होती, याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला आहे.
मात्र या सर्व राजकीय गदारोळात उत्तर प्रदेश सरकारने हाय अलर्ट वर जाऊन प्रयागराज मध्ये 144 कलम लावून टाकले आहे. तिथली इंटरनेट सेवा बंद करून टाकली आहे.
पण त्या पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्त्वाचा धागा अतीकच्या हत्येमुळे तुटला आहे तो म्हणजे, अतीक अहमद देशातल्या तपास यंत्रणांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि भारतात दहशतवादी संघटना यांच्यातल्या घातक संबंधाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती देणार होता. त्याने तशी कबुली दिली होती आणि त्या कबुलीजबाबाचा उल्लेख पोलिसांनी न्यायालयात केलेल्या आरोपपत्रात ठळकपणे केला होता.
अतीकचे ISI शी होते संबंध
स्वतः अतीक अहमदचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सर्विसेस इंटेलिजन्स ISI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि एजंटांशी निकटचे संबंध होते. पंजाब बॉर्डरवर मला नेल्यास तेथे ड्रोन मधून कुठे हत्यारे येतात, ड्रग्स येतात??, ती ठिकाणे मी दाखवू शकतो. तिथूनच हत्यारे देशाच्या विविध भागात पोहोचवली जातात आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील तिथूनच घातक हत्यारे पोहोचतात, असे त्याने कबुली जबाबात म्हटले होते. भविष्यात अतीकला कदाचित उत्तर प्रदेश पोलिसांनी पंजाब बॉर्डरवर देखील नेले असते. त्यामुळे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI आणि भारतातल्या काही दहशतवादी संघटनांच्या संबंधांचा पर्दाफाश झाला असता. पण अतीक अहमद यांच्या हत्येमुळे अनेक बडी गुपिते त्याच्याबरोबर संपुष्टात आली आहेत.
त्यामुळे अतीक अहमद याची हत्या लोकल गॅंगस्टरसनी केली की त्यामागे फार मोठे षडयंत्र आहे??, याचा तपास होणे फार महत्त्वाचे आहे.
अतीकच्या हत्येच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करून विरोधकांना अतीक तपास यंत्रणांना देणार असलेल्या महत्वपूर्ण माहितीकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे आहे का??, अतीकच्या कबुली जबाबा वरून लक्ष ड्रायव्हर्ट करायचे आहे का??, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.
कोणत्याही व्यक्तीला न्यायचित मार्गाने न्याय मिळाला पाहिजे. एन्काऊंटर हा त्याचा मार्ग नव्हे, असे वरवरच्या लॉजिकने निश्चित म्हणता येईल. पण अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या कारवायांची भयानकता, त्यांची प्रयागराज मध्ये असलेली दहशत याचा बारकाईने वस्तुनिष्ठ आढावा घेतला तर त्याच्या हत्येमागचे बरेच वेगळे धागेदरही समोर येऊ शकतील.
अतीक मारल्याचा फायदा कुणाला??
पण त्या पलीकडे जाऊन मारला गेलेला अतीक हा दहशतवादी होता. तो साधुसंत नव्हता अथवा सर्वसामान्य नागरिक नव्हता ,ही वस्तुस्थिती ही लक्षात घेतली पाहिजे. अतीक भारतातल्या तपास यंत्रणांना सहकार्य करून जी महत्त्वाची माहिती देणार होता ही माहिती त्याच्याबरोबर संपुष्टात आल्याने त्याच्या हत्येचा नेमका फायदा कोणाला होऊ शकतो??, हे उघडून डोळे नीट बघितले पाहिजे!!
Atiq was to give information about the nexus of ISI-terrorist groups to the investigating agencies
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!