• Download App
    स्वाती मालीवाल यांच्याशी केजरीवालांच्या घरात "गैरवर्तन"; आम आदमी पार्टीची कबुली; पीए बिभव कुमारवर कारवाईचे आश्वासन!! At the residence of Arvind Kejriwal incident of misbehaviour took place with Swati Maliwal by Vibhav Kumar

    स्वाती मालीवाल यांच्याशी केजरीवालांच्या घरात “गैरवर्तन”; आम आदमी पार्टीची कबुली; पीए बिभव कुमारवर कारवाईचे आश्वासन!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि आम आदमी पार्टीच्या नेत्या खासदार स्वाती मालीवाल यांना काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांचे पीए बिभव कुमार यांनी मारहाण केली. त्याविषयी स्वाती मालीवाल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उठला. At the residence of Arvind Kejriwal incident of misbehaviour took place with Swati Maliwal by Vibhav Kumar

    या पार्श्वभूमीवर ही मारहाणीची घटना घडल्यानंतर 24 तासांनी आम आदमी पार्टीने स्वाती मालीवाल यांच्याशी “गैरवर्तन” झाल्याची कबुली दिली. दारू घोटाळ्यात जामिनावर बाहेर असलेले खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वाती मालीवाल यांच्याशी दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासात गैरवर्तन झाल्याची कबुली दिली. स्वाती मालीवाल अरविंद केजरीवाल यांना भेटायला आले होत्या. त्या ड्रॉइंग रूममध्ये बसल्या होत्या. तिथे बिभव कुमार आले आणि त्यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केले. या गैरवर्तनाचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिभव कुमार यांच्या गैरवर्तनाचे दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले, अशी माहिती संजय सिंग यांनी दिली.

    पण स्वाती मालीवाल यांना बिभव कुमार यांनी मारहाण केली किंवा कसे??, याविषयी त्यांनी शब्दही उच्चारला नाही. त्याचबरोबर स्वाती मालीवाल यांच्यासारख्या राज्यसभा खासदाराला मारहाण करायला किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करायला बिभव कुमार यांना नेमके कोणी सांगितले??, याविषयी देखील खुलासा केला नाही.

    दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी नेमका हाच सवाल उपस्थित केला. बिभव कुमार हाच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सगळी प्रकरणे हाताळतो. त्याला सर्व प्रकरणांमधले इन आऊट्स माहिती आहेत. मग बिभव कुमार याला स्वाती मालीवाल याच्याशी गैरव्यवहार करायला कोणी सांगितले??, असा बोचरा सवाल वीरेंद्र सचदेव यांनी केला.

    स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावर आज दिल्लीत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला स्वाती मालीवाल्यांनी पोलिसांवरे तक्रार दाखल केली त्याविषयी नेमकी पुढे काय चौकशी झाली विभव कुमारला अटक झाली काय??, असे सवाल अनेक सदस्यांनी उपस्थित केले.

    At the residence of Arvind Kejriwal incident of misbehaviour took place with Swati Maliwal by Vibhav Kumar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?