विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लालू प्रसाद यादव यांनी ज्या कुंभमेळ्याची संभावना “फालतू या शब्दांनी केली, त्याच कुंभमेळ्यात जाऊन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्रिवेणी संगमात स्नान करणार आहेत. त्यामुळे Indi आघाडीतले मतभेद पुन्हा समोर आले आहेत.At the Kumbh Mela that Lalu called “useless”, Rahul + Priyanka will bathe in Triveni Sangam!!
दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्यानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत लालूप्रसाद यादव यांनी कुंभमेळाल्याच “फालतू” या शब्दांनी संबोधले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा मागताना कुंभमेळ्यावरच घसरून हिंदू धर्माचा अपमान करून बसले. त्याचे पडसाद सगळ्या देशभर उमटले. जवळपास सर्व राजकीय पक्षांनी लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्याचा निषेध केला. लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध हिंदू समाजाचा संताप उसळला. बिहार विधानसभा निवडणुकीत लालूंच्या पक्षाला धडा शिकवायचा निर्धार भाजपने केला. सोशल मीडियावर लालू प्रसाद ट्रोल झाले.
पण या सगळ्या राजकारणात काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा कुंभमेळा दौरा निश्चित केला. हे दोघेही नेते 19 फेब्रुवारीला प्रयागराज मध्ये येऊन त्रिवेणी संगमात स्नान करणार आहेत. त्यांच्या समवेत काँग्रेसचे बडे नेते कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी ही माहिती दिली. ज्या कुंभमेळ्याची संभावना लालू प्रसाद यादव यांनी “फालतू” शब्दाने केली, त्याच कुंभमेळ्यात जाऊन राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्रिवेणी संगमात स्नान करणार असल्याने लालूंची किरकरी झाली.
At the Kumbh Mela that Lalu called “useless”, Rahul + Priyanka will bathe in Triveni Sangam!!
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar लगेच कोंबड्या मारून जाळून टाकू नका! जीबीएसवर खुलासा करताना अजित पवार यांचे आवाहन
- New Delhi नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी ; दहा पेक्षा अधिकजणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
- India Cooperative Bank : मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ को
- जागतिक लोकशाही धोक्यात आल्याच्या बाता मारणाऱ्या युरोपला जयशंकर यांनी सुनावले; पाश्चात्यांनीच लोकशाही विरोधी देशांना पोसले!!