नवी दिल्ली : आजपासून नवी दिल्लीत दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला सुरूवात झाली आहे. यासाठी जगभरातील देशांचे प्रमुख हजर झाले आहेत. या शिखर परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे आणि माझ्या संवेदना तेथील लोकांसोबत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, या शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांचे भारत स्वागत करतो. At the inauguration of the G20 summi Prime Minister Modi told the world the mantra of two and a half thousand years ago
शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, येथून काही किलोमीटर अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षे जुना एक स्तंभ आहे, ज्यावर प्राकृत भाषेत ”हेवं लोकश:हित मुखेति, अथ: इयं नातेशु हेवं” म्हणजे असे लिहिले आहे की, मानवतेचे हित आणि त्याचे कल्याण सुनिश्चित व्हावे. अडीच हजार वर्षांपूर्वी या भारतभूमीतून संपूर्ण जगाला हा संदेश देण्यात आला होता. २१व्या शतकातील हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा देणारा आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहेत.
कोविड 19 नंतर विश्वासाच्या अभावाच्या रूपात जगावर मोठे संकट उभे राहिले आहे. युद्धामुळे विश्वासाची तूट अधिकच वाढली आहे. जेव्हा आपण कोविडला पराभूत करू शकतो, तेव्हा परस्पर अविश्वासाच्या रूपात आलेल्या संकटालाही हरवू शकतो. चला आपण मिळून जागतिक विश्वासाची कमतरता विश्वास आणि आत्मविश्वासात बदलू या. सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयत्न हा मंत्र आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
At the inauguration of the G20 summit Prime Minister Modi told the world the mantra of two and a half thousand years ago
महत्वाच्या बातम्या
- आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; भ्रष्टाचार प्रकरणी CIDची कारवाई!
- ५० वर्षांचे काम अवघ्या सहा वर्षात पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या कामाची जागतिक बँकेनेही केली प्रशंसा!
- G20 Summit: पंतप्रधान मोदींचे G20 शिखर परिषदेसंदर्भात ट्वीट, काय म्हणाले ते जाणून घ्या?
- जो बायडेन भारतात दाखल, G20 शिखर परिषदेआधी मोदींसमवेत द्विपक्षीय चर्चा; भारत – अमेरिका पोर्टेबल अणुभट्ट्या करार!!