अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले; अमेरिकेचे अध्यक्षांनी भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांचे स्वागत केले!!, एवढा मोठा फरक गेल्या 17 वर्षांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पडला.
2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर हल्ला केला. त्या हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायचे होते. त्या संदर्भात भारत सरकारची तयारी देखील चालू होती, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक कारवाई करण्याच्या सल्ला सुद्धा दिला होता, पण त्यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राईस भारताच्या दौऱ्यावर आल्या आणि त्यांनी भारताचा पाकिस्तानवरचा संभाव्य हल्ला रोखून धरला. भारताने पाकिस्तानवर प्रतिहल्ला करू नये. पाकिस्तानवर सैन्य कारवाई करून चोख प्रत्युत्तर देऊ नये. त्याऐवजी भारताने नेहमीप्रमाणे राजनैतिक पातळीवरच्या कठोर उपाय योजना कराव्यात असे सांगून आणि तशी “व्यवस्था” करून कोंडोलिसा राईस भारतातून अमेरिकेत निघून गेल्या. या सगळ्या घटनाक्रमाची कबुली त्या वेळचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच जाहीरपणे दिली.
2008 पासून 17 वर्षांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणात बराच बदल झाला. याच दरम्यानच्या काळात पहलगाम हल्ला झाला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 घडले. त्याच्या आधी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राईक पण होऊन गेला होता.
पण 2025 मध्ये गाजा़ शांतता कराराच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इजिप्तचे शहर शर्म अल शेख मध्ये आमंत्रित केले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिथे गेले नाहीत किंवा त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सुद्धा तिथे पाठविले नाही. मोदींनी आपले प्रतिनिधी म्हणून भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांना शर्म अल शेख शहरात पाठविले. डोनाल्ड ट्रम्प यांचे निमंत्रण मोदींनी भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांकडे वळविले. ते स्वतः शर्म अल शेखला गेले नाहीत. शर्म अल शेख मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर फोटो काढला. तो फोटो कीर्ती वर्धन सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला. भारताच्या पंतप्रधानांचा प्रतिनिधी म्हणून मी शर्म अल शेख इथे आलो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी माझे स्वागत केले, असे त्यावर त्यांनी लिहिले.
– अमेरिकन प्रशासन कसे काम करायचे??
2008 ते 2025 अशा 17 वर्षांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणात एवढा मोठा फरक पडला. आधीच्या काळात अमेरिका आपल्या परराष्ट्र खात्यामध्येच वेगवेगळे विभाग करून दक्षिण आशियासाठी स्वतंत्र मंत्री नेमले जायचे. ते भारत, पाकिस्तान आणि अन्य दक्षिण आशियाई देशांच्या संपर्कात असायचे. तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे प्रतिनिधी म्हणून भारताच्या पंतप्रधानांची किंवा परराष्ट्र मंत्र्यांची वाटाघाटी करायचे. अमेरिकेचे अध्यक्ष किंवा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री क्वचितच खाली उतरून भारत किंवा दक्षिण आशियाई देशांच्या राष्ट्रप्रमुखांबरोबर वाटाघाटी करायचे. रॉबिन राफेल, ख्रिस्तीना रोक्का, रिचर्ड बाऊचर, रॉबर्ट ब्लॅक हे त्या पदांवर असायचे. डोनाल्ड लू सारखे लुडबुडे सुद्धा दक्षिण आशिया विभागाचे मंत्री होते ते बायडिंग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये राहून भारत विरोधी कारवाया करायचे. हे सगळे भारताचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना भेटायचे.
थोडक्यात अमेरिकन प्रशासनाने आपल्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना/अधिकाऱ्यांना भारतातल्या पहिल्या फळीतल्या नेत्यांशी समकक्ष म्हणजेच बरोबरीचे करून ठेवले होते.
– ट्रम्प यांच्या निमंत्रणाला “टांगले”
आताही अमेरिकन प्रशासनात असे दक्षिण आशिया विषयक मंत्री अस्तित्वात आहेत. पण आता त्यामध्ये फार मोठा फेरबदल होऊन अमेरिकेचे अध्यक्ष भारतातल्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांचे स्वागत करताना दिसले. शर्म अल शेख मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांचे स्वागत केले, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांशी वाटाघाटी करत होते. यातून मोदींनी आपण ट्रम्प यांच्या निमंत्रणाला नेमके किती “महत्त्व” देतो, हे सूचकपणे दाखवून दिले.
At the Gaza Peace Summit in Sharm El-Sheikh, Egypt, as the Special Envoy of Prime Minister Narendra Modi.
महत्वाच्या बातम्या
- प्रत्येक 30 मिनिटांनी पश्चिम बंगालमध्ये एका महिलेवर अत्याचार, महिलांविरोधातील भीषण वास्तव एनसीआरबी अहवालाने उघड
- Haryana : हरियाणा IPS आत्महत्या, सहाव्या दिवशीही शवविच्छेदन नाही; SIT सदस्य रोहतकमध्ये दाखल
- Chandrashekhar Azad : चंद्रशेखर म्हणाले- असे वाटते की मायावती घाबरल्या आहेत, त्यांना धमकावले जात आहे, काहीतरी गुपित आहे
- बिहारमध्ये निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा; पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडविला!!