• Download App
    तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा करू नका, निदान माझ्या अंतयात्रेला तरी या; कलबुर्गीच्या मतदारांवर मल्लिकार्जुन खर्गेंचा वैताग!! at least come to my funeral congress chief kharge to voters in karnataka

    तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा करू नका, निदान माझ्या अंतयात्रेला तरी या; कलबुर्गीच्या मतदारांवर मल्लिकार्जुन खर्गेंचा वैताग!!

    वृत्तसंस्था

    कलबुर्गी : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना काँग्रेस, भाजप आणि बाकीचे सगळे पक्ष घायकुतीला आलेच आहेत. ते भावनिक आवाहन करताना मतदारांवरच घसरत आहेत. आज काँग्रेसच्या प्रचाराचे भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कलबुर्गीच्या मतदारांवर असेच घसरले. at least come to my funeral congress chief kharge to voters in karnataka

    कलबुर्गी मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही काँग्रेसला मतदान करा किंवा करू नका, पण मी कलबुर्गीसाठी आणि मतदारांसाठी काही केले आहे, असे वाटत असेल, तर निदान माझ्या अंतयात्रेला तरी या, अशा शब्दांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदारांवर आपला वैताग काढला.

    मल्लिकार्जुन खर्गे आपल्या राजकीय दीर्घ जीवनात कलबुर्गीचे खासदार राहिले. 2009 ते 2019 या कालावधीत त्यांनी कलबुर्गी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, 2019 19 च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी राज्यसभेत प्रवेश केला. सध्या ते काँग्रेसचे अध्यक्ष असून “इंडिया” आघाडीचे देखील ते चेअर पर्सन आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी वर्षानुवर्षे कलबुर्गी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांनी भाजप लाटेतही मतदारांनी काँग्रेसलाच मतदान करावे, असे सांगताना थेट स्वतःच्या अंत्ययात्रेचा उल्लेख केल्याने कर्नाटकसह देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

    at least come to my funeral congress chief kharge to voters in karnataka

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स