• Download App
    असुद्दीन ओवेसी यांनी नाकारली केंद्राकडून दिलेली झेड सुरक्षा, म्हणाले जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन.|Asuddin Owaisi denied the Z security provided by the Center, saying he would leave when the time came.

    असुद्दीन ओवेसी यांनी नाकारली केंद्राकडून दिलेली झेड सुरक्षा, म्हणाले जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मला मृत्युची भीती वाटत नाही, मला झेड श्रेणीची सुरक्षा नकोय, मी ती नाकरतो. मला अ श्रेणीचा नागरिक बनवा. मी गप्प बसणार नाही. कृपया न्याय करा. त्यांच्यावर(हल्लेखोर) यूएपीए नुसार आरोप लावा. द्वेष, कट्टरतावाद संपवण्याचे मी सरकारला आवाहन करतो, असे आवाहन एमआयएमआयचे प्रमुख खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.Asuddin Owaisi denied the Z security provided by the Center, saying he would leave when the time came.

    खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी हल्ला झाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने त्यांना तत्काळ प्रभावाने सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ओवेसींनी सुरक्षा नाकारली आहे.



    हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचे सांगत ते म्हणाले, १९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन.

    Asuddin Owaisi denied the Z security provided by the Center, saying he would leave when the time came.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही