हिंसक घटनानंतरही मतदारांनी दाखवला उत्साह
विशेष प्रतिनिधी
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील विधानसभेच्या सर्व 230 आणि छत्तीसगडमधील उर्वरित 70 जागांसाठी काल मतदान पार पडले. दोन्ही राज्यांमध्ये मतदाना दरम्यान काही ठिकाणी हिंसक घटना घडूनही मतदरांनी उत्साह दाखवल्याचे दिसून आले. सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झाले. Assembly elections 71 percent in Madhya Pradesh 68 percent in Chhattisgarh
मध्य प्रदेशात एकूण 71.16 टक्के तर छत्तीसगडमध्ये 68.15 टक्के मतदान झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्यावेळी 75 टक्के मतदान झाले होते. रतलामच्या सैलाना विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85.49 टक्के मतदान झाले.
मध्यप्रदेश विधानसभेसाठी २३० जागांवर उद्या निवडणूक, एकाच टप्प्यात होणार मतदान
मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, मी सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करतो. तुमचे प्रत्येक मत लोकशाहीसाठी मौल्यवान आहे
बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान झाले होते. तर उर्वरित 70 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले.