आता काझी विवाह नोंदणी करू शकत नाहीत
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममध्ये आता काझींना मुस्लिम विवाहांची नोंदणी करता येणार नाही. वास्तविक, आसाम विधानसभेने मुस्लिमांच्या विवाह आणि घटस्फोटाशी संबंधित विधेयक मंजूर केले आहे. राज्याचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री जोगेन मोहन यांनी दोन दिवसांपूर्वी हे विधेयक सभागृहात मांडले होते, ते आज एकमताने मंजूर करण्यात आले. नवीन कायदा लागू झाल्यानंतर राज्यात बालविवाह नोंदणीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. X वर पोस्ट करताना ते म्हणाले की, आसामच्या मुलींसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आसाम विधानसभेतून मुस्लिम नोंदणी विधेयक 2024 मंजूर करण्यात आले आहे. नव्या कायद्यानंतर आता अल्पवयीन विवाहाची नोंदणी कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहे. याशिवाय आता मुस्लिम विवाहांची नोंदणी काझी नाही तर सरकार करणार आहे. मुस्लिम पर्सनल लॉ आणि इस्लामिक रितीरिवाजानुसार होणाऱ्या विवाहांमध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करणार नाही, असेही सरमा यांनी स्पष्ट केले.
मुलगी हिंदू असो वा मुस्लिम, आमचे सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी सांगितले. ते म्हणाले की मी आसामच्या लोकांना विनंती करतो की आम्हाला पाठिंबा द्या आणि ही प्रथा इतिहासापुरती मर्यादित राहू द्या. आधुनिक काळात याची अजिबात गरज नाही.
Assam Legislative Assembly has passed the Muslim Marriage and Divorce Bill
महत्वाच्या बातम्या
- Japan : जपानमध्ये तांदळाची तीव्र टंचाई, सुपरमार्केट्स झाली रिकामी, भूकंप-वादळाच्या भीतीने घराघरांत केला जातोय साठा
- काँग्रेसच्या सर्व्हेत राष्ट्रीय पक्षांनाच मोठ्या यशाची हमी; ठाकरे – पवारांचा नुसताच बोलबाला, प्रत्यक्षात ते 60 – 60 जागांचे धनी!!
- Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अभियंता चेतन पाटीलने झटकले हात!!
- Farhatullah Ghauri’s : पाकिस्तानी दहशतवादी फरहतुल्ला गौरीची भारतावर हल्ल्याची धमकी; स्लीपर सेलला गाड्या रुळावरून उतरवण्यास सांगितले