• Download App
    आसाम सरकारने गेंड्याची २५०० शिंगे जाळली, शिंगात काहीही औषधी गुणधर्म नसल्याचे स्पष्ट ; गेंडे वाचवा मोहिमेला चालना देण्यासाठी उपक्रम । Assam government burn 2500 horns on world rhino day

    आसाम सरकारने गेंड्याची २५०० शिंगे जाळली, शिंगात काहीही औषधी गुणधर्म नसल्याचे स्पष्ट ; गेंडे वाचवा मोहिमेला चालना देण्यासाठी उपक्रम

    वृत्तसंस्था

    दिसपूर : जागतिक गेंडा दिनी आसाम सरकारने चक्क २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. शिंगात औषधी गुणधर्म असतात, या एका चुकीच्या समज जनतेच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सरकारने स्पष्ट केले. Assam government burn 2500 horns on world rhino day



    जागतिक गेंडा दिवस २२ सप्टेंबरला केला जातो. त्या दिवशी आसाम सरकारने २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. आसामच्या गोलाघाट जिल्ह्याच्या बोकाखाट भागात एकूण २ हजार ४७९ शिंगं जाळली आहेत. ९४ शिंगं ही संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनीच हेलिकॉप्टरमधून ही शिंगं जाळण्याची प्रक्रिया सुरू केली. ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिमंता बिस्व शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे.

    Assam government burn 2500 horns on world rhino day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक