• Download App
    आसाममध्ये पावसामुळ मृतांची संख्या १४ वर। Assam death toll rises to 14

    आसाममध्ये पावसामुळ मृतांची संख्या १४ वर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) रविवारी माहिती दिली की जोरदार वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. याआधी शनिवारी वादळामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. Assam death toll rises to 14

    एकूण ५९२ गावांतील २०२८६ लोक बाधित झाले. १५ एप्रिल रोजी डिब्रूगड जिल्ह्यातील टिंगखॉंग भागात चार, बारपेटा जिल्ह्यात तीन आणि गोलपारा जिल्ह्यात १४ एप्रिलला एकाचा मृत्यू झाला. गोलपारा, बारपेटा, दिब्रुगड, कामरूप (मेट्रो), नलबारी या ५९२ गावांमध्ये एकूण २०,२८६ लोक बाधित झाले आहेत. शनिवारी एएसडीएमएच्या अहवालात म्हटले आहे की चिरांग, दरंग, कचार, गोलाघाट, कार्बी आंगलाँग, उदलगुरी, कामरूप जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आले आहे.



    अनेक घरे उद्ध्वस्त

    दिब्रुगड जिल्ह्यातील टिंगखॉंग भागात वादळामुळे बांबूची झाडे उन्मळून पडल्याने एका अल्पवयीन मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला. गोलपारा जिल्ह्यातील माटिया भागात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. काल ASDMA च्या अहवालात असेही म्हटले आहे की ५,८०९ श कच्ची घरे आणि ६५५ पक्की घरे अंशत: नुकसान झाले, तर ८५३ कच्ची घरे आणि २७ पक्की घरे पूर्णपणे खराब झाली. याशिवाय राज्यातील १२ जिल्ह्यांतील इतर ३४ संस्थांनाही अतिवृष्टी आणि वादळाचा फटका बसला आहे.

    Assam death toll rises to 14

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते