विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाम मध्ये हेमंत विश्व शर्मा यांच्या सरकारने बसुंधरा मिशन 2.0 अंतर्गत तब्बल 2,29,000 आदिवासी परिवारांना आज त्यांच्या हक्काचे जमीन वाटप केले. त्यामुळे बांगलादेशातून वेगवेगळ्या कालावधीमध्ये आसाममध्ये घुसलेले मियाँ मुसलमान अर्थात बांगलादेशी घुसखोर चिडले. त्यांनी आसाम सरकारविरुद्ध संतप्त निदर्शने केली. पण हेमंत विश्व शर्मा यांचे सरकार आपल्या मूळ योजनेपासून मागे हटले नाही. सरकारने ब्रह्मपुत्र खोरे आणि बराक खोरे यांच्यातील जमिनीचे वाटप आदिवासी समुदायांना केले. Assam CM Himanta Biswa Sarma distributed ‘Land Pattas’ under Mission Basundhara 2.0
आसाम मधल्या या भूमीवर गेल्या 70 वर्षांपासून मियाँ मुसलमान अर्थात बांगलादेशी घुसखोरच कब्जा करून बसले होते. परंतु आसाम मध्ये हेमंत विश्व शर्मा यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी 48 लाख स्थानिक आसमी मुसलमानांची ओळख पटवून घेतली. त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना आखल्या, पण “बंगाली मुस्लिम” या नावाखाली आसाम मध्ये घुसलेल्या मियाँ मुसलमानांना म्हणजेच बांगलादेशी घुसखोरांना मात्र विविध सरकारी योजनांमधून वगळले. आसाम मध्ये मुस्लिमांची संख्या 34.19% आहे. ही संख्या मुळात या संख्यावाढीचे कारण बांगलादेशी घुसखोरच आहेत.
आसाम मध्ये बस्तान बसवले
1947 मध्ये भारताच्या फाळणी नंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान अस्तित्वात आले. परंतु त्या आधी 1940 च्या दशकातच फाळणीची शक्यता लक्षात घेऊन मियाँ मुसलमानांनी म्हणजेच पूर्व पाकिस्तानच्या भूमीत राहणाऱ्या मुसलमानांनी आसाममध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी तिथल्या स्थानिक काँग्रेस पुढाऱ्यांचे देखील त्यांना पाठबळ मिळाले होते. यात एक मोठे नाव होते, ते म्हणजे फक्रुद्दीन अली अहमद. हे नंतर भारताचे राष्ट्रपती बनले होते. परंतु त्यांच्या राजकीय चरित्रात ते बांगलादेशी अर्थात पूर्व पाकिस्तान मधल्या घुसखोरांना आसाममध्ये सामील करून त्यांचे बस्तान बसवत होते, याचे उल्लेख ठळकपणे आढळतात.
त्याच मियाँ मुसलमानांचे अर्थात बांगलादेशी घुसखोरांचे वंशज आसाम मधल्या विविध सरकारी योजनांवर संतापले आहेत. गेल्या 5 वर्षात आसाम सरकारने विविध घुसखोरांनी बळकावलेल्या जमीन कायदेशीर मार्गाने सोडवून घेतल्या आणि त्याचेच पट्टे पाडून ते त्यांच्या मूळ मालकांना म्हणजे विविध आदिवासी समुदाय यांच्या कुटुंबांना वाटप सुरू केले, हीच ती बसुंधरा योजना आहे.
आसाममध्ये आदिवासींची संख्या 12.49% आहे. हे ब्रम्हपुत्रा नदीच्या खोऱ्यातले आणि बराक नदीच्या खोऱ्यातले मूळ रहिवासी आहेत. मात्र या मूळ रहिवाशांना फसवून आणि हाकलून देऊन बांगलादेशी घुसखोरांनी तिथल्या करोडो किमती रुपयांच्या जमिनी बाळकावल्या होत्या. मात्र कायदेशीर कागदपत्रे धुंडाळून आसाम सरकारने बसुंधरा योजना तयार केली आणि त्या आधारे आसामचे मूळ रहिवासी असलेल्या विविध आदिवासी समुदायांच्या परिवारांना त्यांच्या मूळ जमिनी परत करण्याचे धोरण आखले.
आसाम सरकारच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांची व्यवस्थित छाननी करून आदिवासी अनुसूचित जाती जमाती आदींची 2,29,000 कुटुंबे आयडेंटिफाय केली आणि त्यांना आज हेमंत विश्व शर्मा यांच्या सरकारने त्यांच्या जमिनींचे वाटप केले. ब्रह्मपुत्रा खोऱ्यात 3,02,545 बिघा जमिनीचे, तर बराक खोऱ्यात 1214 बिघा जमिनींचे व्यवस्थित पट्टे पाडून त्याचे हक्क 2,29,000 कुटुंबांना देण्यात आले यापैकी तब्बल 84% कुटुंबे आदिवासी आहेत.
आसाम सरकारने त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविले होते. मियाँ मुसलमानांनी देखील आधीच बळकावलेल्या जमिनीच्या नवीन हक्कासाठी जमिनीसाठी अर्ज केले होते. परंतु, त्यांचे अर्ज व्यवस्थित कायदेशीर प्रक्रिया करून आसाम सरकारने फेटाळले. त्यामुळे अर्थातच त्यांनी बळकावलेल्या जमिनी आता मूळ आदिवासींना परत गेल्या आहेत. त्यामुळे मियाँ मुसलमान चिडले आणि त्यांनी आसाम सरकार विरुद्ध संतप्त निदर्शने केली. पण सरकार मात्र आपल्या मूळ योजनेपासून मागे हटले नाही. हेमंत विश्व शर्मांनी भव्य कार्यक्रम घेऊन आदिवासींना जमीन वाटप केले. हे आसाममध्ये फार मोठे “राजकीय आक्रित” घडले!!
Assam CM Himanta Biswa Sarma distributed ‘Land Pattas’ under Mission Basundhara 2.0
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर शरद पवारांना आजही “शंका”; ठाकरे – पवार सरकारच्या काळात आरक्षण रद्द झाल्याचा फडणवीसांवरच ठेवला “ठपका”!!
- संदेशखलीप्रकरणी कलकत्ता हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले, आतापर्यंत एका व्यक्तीला का पकडू शकले नाहीत पोलिस?
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अहि – नकुलाचे वैर संपले; उद्धव ठाकरेंकडून शिंदे – फडणवीस यांचे आभार!!
- पाकिस्तानात राजकीय गोंधळ सुरूच! इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने केली युतीची घोषणा