• Download App
    आदिवासी समाजाच्या भावनेची आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली कदर, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानातून काढून टाकण्याचा निर्णय |Assam CM appreciates tribal sentiments, decides to remove former PM Rajiv Gandhi's name from Orang National Park

    आदिवासी समाजाच्या भावनेची आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली कदर, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानातून काढून टाकण्याचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आदिवासी समाजाच्या भावनांची कदर करत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी औरंग राष्ट्रीय उद्यानातून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटविण्याचा निर्णय घेतला आहे.Assam CM appreciates tribal sentiments, decides to remove former PM Rajiv Gandhi’s name from Orang National Park

    आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि आदिवासी आणि चहा मळ्यातील मजूर समुदायाचे प्रमुख सदस्य यांच्यात नुकतीच चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रीय उद्यानातून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटवण्याची मागणी केली होती, असे संसदीय कामकाज मंत्री पिजूष हजारिका यांनी सांगितले.



    ओरंग या नावाशी आदिवासी आणि चहामळा मजूर समुदायाच्या भावना जोडल्या आहेत. झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडचे रहिवासी असलेल्या ओराण लोकांच्या नावावरून या राष्ट्रीय उद्यानाला नाव देण्यात आले आहे.

    आसामच्या चहा-बागेत काम करण्यासाठी ब्रिटिशांनी या जमातीचे हजारो लोक आणले होते.या समाजातील लोकांच्या भावनांची कदर करून आसाम मंत्रिमंडळाने राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून औरंग राष्ट्रीय उद्यान करण्याचा निर्णय घेतला आहे.

    ब्रह्मपुत्रेच्या उत्तर किनाऱ्यावर स्थित, 78.80 चौरस किमी मध्ये पसरलेले ओरंग राष्ट्रीय उद्यान हे राज्यातील सर्वात जुने अभयारण्य आहे. 1985 मध्ये याला वन्यजीव अभयारण्य असे नाव देण्यात आले आणि 1999 मध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले.

    ऑगस्ट 2005 मध्ये तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने स्थानिक नागरिकांच्या विरोधाला न जुमानता माजी पंतप्रधानांच्या नावे ओरंग राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता.

    ओरंग जमातीतील बरेचअनेक लोक उद्यानालगतच्या भागाजवळ स्थायिक झाले होते. या क्षेत्राचे नाव त्यांच्यामुळेच पडले आहे.२०११ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये 73,437 ओराण लोक आहेत.

    Assam CM appreciates tribal sentiments, decides to remove former PM Rajiv Gandhi’s name from Orang National Park

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..