• Download App
    आसाममध्ये बांगलादेशातून स्मगलिंग करून आणलेल्या ड्रग्जच्या साठ्यावरून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांनी स्वतः चालविला बुलडोझर Assam Chief Minister Himanta Biswa Sarma drives a bulldozer during a programme on 'Seized Drugs Disposal' in Nagaon

    आसाममध्ये बांगलादेशातून स्मगलिंग करून आणलेल्या ड्रग्जच्या साठ्यावरून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांनी स्वतः चालविला बुलडोझर

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी – आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा सध्या जबरदस्त ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत. लोकसंख्या नियंत्रण धोरण, गोरक्षा बिल यांच्यासारखे एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय ते घेत आहेत. त्यापुढे जाऊन त्यांनी आसाममधली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. Assam Chief Minister Himanta Biswa Sarma drives a bulldozer during a programme on ‘Seized Drugs Disposal’ in Nagaon

    आसाममध्ये सीमेपलिकडून अर्थात बांगलादेशातून तस्करीच्या मार्गाने आलेल्या ड्रग्जच्या साठ्यावर मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी स्वतःहून बुलडोझर चालविला आहे. आसाममध्ये सीमेपलिकडून दरवर्षी सुमारे १००० कोटींच्या ड्रग्जची तस्करी होते. ती मोडून काढण्याचा हेमंत विश्वकर्मा यांनी पण केला आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून परवाच त्यांनी तस्करीच्या ड्रग्जची जाहीर होळी केली होती. आज त्यांनी नागाव येथे तस्करीच्या ड्रग्जच्या साठ्यावरून बुलडोझर चालविला.

    आसाममध्ये बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीच्या बरोबरीने ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. आसाममधून बांगलादेशात गोवंशाची तस्करी होते. या दोन्ही तस्करी रोखण्याचा पण हेमंत विश्वशर्मा यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांनी नुकतेच गोवंश रक्षण बिल विधानसभेत मंजूर करवून घेतले आणि आता तस्करीच्या ड्रग्जवर स्वतः बुलडोझर चालविला. राज्यात त्यांनी ड्रग्ज पकडण्याची मोठी मोहीम चालविण्याचे टार्गेटच पोलीसांना दिले आहे.

    Assam Chief Minister Himanta Biswa Sarma drives a bulldozer during a programme on ‘Seized Drugs Disposal’ in Nagaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले