वृत्तसंस्था
गुवाहाटी : स्वतःचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स काढून टाका, अशी सूचना आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे. स्वतःचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नेमणे ही काँग्रेसची राजकीय संस्कृती आहे. मी काँग्रेसमध्ये असताना ही संस्कृती अनुभवली आहे. भाजप नेत्यांना त्या गोष्टीची गरज नाही, अशा परखड शब्दांमध्ये हेमंत विश्वकर्मा यांनी काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचा समाचार घेतला आहे. Assam Chief Minister Hemant Vishwasharma’s suggestion to BJP leaders, but why ??
भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हेमंत विश्वास शर्मा म्हणाले, की भाजप नेत्यांनी कोणतेच गैर कृत्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका उद्भवत नाही. स्वतःचे सिक्युरिटी ऑफिसर नेमणे, स्वतः भोवती सुरक्षेचे जाळे तयार करणे ही तर असुरक्षित नेत्यांची राजकीय गरज असते. काँग्रेसमध्ये तशी राजकीय गरज असायची.
मी पूर्वी काँग्रेसमध्ये असल्यामुळे मला त्या सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती आहे. भाजप नेत्यांनी कुठलेही गैरकृत्य केलेले नाही. त्यामुळे त्यांना अशा वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही. त्यामुळे भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपले पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स ताबडतोब काढून टाकावेत, अशी सूचना हेमंत विश्व शर्मा यांनी केली आहे.
भाजप नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नेहमी जनतेबरोबर राहिले पाहिजे. जनतेपासून आपले अंतरात पडेल, असे कोणतेही कृत्य करता कामा नये अशा शब्दांमध्ये भाजपचे आसाम प्रदेशाध्यक्ष भावेश कलीता यांनी हेमंत विश्वशर्मा यांच्या सूचनेचे समर्थन केले.
Assam Chief Minister Hemant Vishwasharma’s suggestion to BJP leaders, but why ??
महत्त्वाच्या बातम्या