• Download App
    आसाममध्ये ॲनिमल स्टॉलर सुधारणा विधेयकाला मंजूरी , मुख्यमंत्र्यांनी सांगितले  प्रत्येकाला अनुसरण करावे लागेल। Assam Animal Stallor Amendment Bill approved, CM says everyone has to follow

    आसाममध्ये ॲनिमल स्टॉलर सुधारणा विधेयकाला मंजूरी , मुख्यमंत्र्यांनी सांगितले  प्रत्येकाला अनुसरण करावे लागेल

    आता मंदिर/मठांच्या पाच किलोमीटरच्या परिसरात गोमांस विकले जाणार नाही किंवा त्याची कत्तल केली जाणार नाही.


    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : विधानसभेत गुरेढोरे वध प्रतिबंध विधेयक शुक्रवारी मंजूर करण्यात आले.  राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे – विधेयक आज मंजूर झाले आहे.  आता मंदिर/मठांच्या पाच किलोमीटरच्या परिसरात गोमांस विकले जाणार नाही किंवा त्याची कत्तल केली जाणार नाही.  Assam Animal Stallor Amendment Bill approved, CM says everyone has to follow

    जेथे हिंदू, शीख, जैन सारखे गोमांस न खाणारे समुदाय राहतील तेथे गोमांस विक्री होणार नाही.  जर मुस्लिम देखील या भागात राहतात, तर ते सुद्धा गोमांस खाणार नाहीत.



    ते म्हणाले की, या विधेयकातील सूचनांसाठी तीस दिवसांचा वेळ देण्यात आला होता.  आम्ही विरोधकांनी सुचवलेल्या सूचना ऐकायला तयार होतो पण त्यांनी कोणतीही योग्य वस्तुस्थिती समोर आणली नाही.आज मंजूर झालेले विधेयक हे कॉंग्रेसने 1950 च्या दशकात आणलेल्या कायद्यात फक्त सुधारणा आहे.

    त्यांनी सांगितले- आम्ही जिल्ह्याबाहेर जनावरांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.  हे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कत्तलीसाठी नेले जाऊ शकत नाहीत.  शेतीशी संबंधित प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.

    त्याचवेळी, मुख्यमंत्री म्हणाले – गेल्या पाच वर्षांत, बहुतेक जातीय वाद गोमांस खाण्यामुळे झाले आहेत.  गोमांस न खाणाऱ्या समुदायाची भावना लक्षात ठेवायला हवी.

    Assam Animal Stallor Amendment Bill approved, CM says everyone has to follow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!