नाशिक : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल, भारतीय पोलीस दल यांच्यातले अधिकारी आणि जवान एवढे संतप्त झालेत की त्यांच्या अंगाचा अक्षरशः तीळपापड झालाय. एरवी कसोटीचे प्रसंग अत्यंत संयमाने हाताळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुखातूनही आता अक्षरशः आग बाहेर पडत आहे. जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक राहिलेले शेष पाल वैद यांच्या मुखातून देखील अशीच आग बाहेर पडली.
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला असा धडा शिकवला पाहिजे की, त्यांचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हा चड्डीत हागला आणि मुतला पाहिजे, अशा परखड शब्दांमध्ये DGP शेष पाल वैद यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. जम्मू काश्मीरमधील दहशतवादाची दारुण वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
-DGP वैद म्हणाले :
जम्मू काश्मीर मध्ये स्थानिक दहशतवादी आता ऑपरेट करत नाहीत, तर पाकिस्तानी लष्करातले स्पेशल कमांडोज दहशतवाद्यांच्या वेशात येऊन काश्मीर मधले ऑपरेशन चालवतात. पहलगाम मधला हल्ला हा स्थानिक दहशतवाद्यांनी केलेला नाही, तर पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल कमांडोजनी तो हल्ला केलाय. जनरल असीम मुनीर दोन चारच दिवसांपूर्वी काहीतरी बरळलतो आणि लगेच पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांची हत्या होते, हा योगायोग नाही हा वेल प्लांड अटॅक आहे.
काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी लष्कराचे 80 ते 90 कमांडोज, तर जम्मूमध्ये 60 ते 70 कमांडोज दहशतवाद्यांच्या बुरख्याखाली वावरत आहेत. त्यांना वेचून मारले पाहिजे.
भारताने या हल्ल्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. आता वेळ घालवण्यापेक्षा पाकिस्तानचे चार तुकडे करून टाकले पाहिजेत. सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा आणि पंजाब असे चार तुकडे करून पाकिस्तानी लष्कर मोडून काढले पाहिजे. भारताने पाकिस्तानला असा धडा शिकवला पाहिजे की त्यांचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर चड्डीत हागला आणि मुतला पाहिजे.
कारण असीम मुनीर हा पाकिस्तानी आर्मीच्या वेशातला खरा दहशतवादी आहे. सय्यद सलाउद्दीन आणि हाफिज सईद ही त्याची प्यादी आहेत. या प्याद्यांना या प्याद्यांना मारलेच पाहिजे पण त्या पलीकडे जाऊन असीम मुनीरला खरा धडा शिकवला पाहिजे.
कुठलाही कसोटीचा प्रसंग आला, तरी सहसा भारतीय राजनैतिक वर्तुळातले अधिकारी, भारतीय सैन्यदल आणि पोलीस दलातले अधिकारी तो कठोरपणे पण संयमाने हाताळतात. मानवी भावनांनी ते संतप्त जरूर होतात, पण त्यांच्या मुखातून एवढी आग ओकणारी करणारी भाषा कधी बाहेर पडत नाही. तशी भाषा आत्तापर्यंत तरी आमच्या पत्रकारांच्या ऐकीवात आली नाही. पण ज्या पद्धतीने DGP वैद यांच्या तोंडून असीम मुनीर चड्डीत हागला आणि मुतला पाहिजे, अशी भाषा आली, त्या अर्थी पाकिस्तानी दहशतवादाची मजल डोक्यावरून पाणी गेल्या इतपत पुढे गेली, हेच उघडपणे दिसून आले.
पाकिस्तान नावाच्या दहशतवादी देशाला आंतरराष्ट्रीय वर्तुळात वापरली जाणारी कुठलीही राजनैतिक सभ्य अथवा कडक भाषा समजत नाही. त्यांना फक्त मशीन गन्स मधल्या गोळ्यांची आणि तोफ गोळ्यांचीच भाषा समजते. असेच असेल तर त्यांना त्याच भाषेत समजावून सांगितले पाहिजे. तिथे कुठलीही राजनैतिक साधी सरळ गुळमुळीत भाषा चालणारच नसेल, तर तिचा वापर करूनही काही उपयोग नाही, हेच वास्तव DGP वैद यांच्या वक्तव्यातून समोर आले.
Asim Munir should sh*t in his pants: J&K ex-DGP Vaid slams Pak Army Chief |Pahalgam terror attack
महत्वाच्या बातम्या
- अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी म्होरक्यांना टिपून टिपून मारले, पण त्यावर पहेलगाम हल्ल्याने पाणी फेरले!!
- पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी