तामिळनाडूलाही निवडणुकीआधीच मिळाली मोठी भेट
विशेष प्रतनिधी
नवी दिल्ली : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वन्यजीवांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि ही देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. यासोबतच, वन्यजीवांचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी आणि मानवांशी त्यांचा वाढता संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी देशात एक उत्कृष्टता केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे.PM Modi
हे केंद्र तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री (SACON) येथे स्थापन केले जाईल. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांकडून तामिळनाडूला ही मोठी भेट मिळाली आहे.
एवढेच नाही तर यावेळी पंतप्रधान मोदींनी यावर्षी मे महिन्यात आशियाई सिंहांची गणना करण्याची घोषणाही केली. सकाळी मोदींनी गीरमध्ये वाघ सफारीचा आनंद घेतला. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, सामूहिक प्रयत्नांमुळे आशियाई सिंहांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि आशियाई सिंहांचे अधिवास जपण्यात आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या आदिवासी आणि महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे.
‘Asiatic lion census to be conducted in May PM Modi makes big announcement
महत्वाच्या बातम्या
- Dolphin भारतात पहिल्यांदाच करण्यात आले ‘रिव्हर डॉल्फिन’ सर्वेक्षण
- Hardeep Puri : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे – हरदीप पुरी
- पापी औरंग्याला उत्तम प्रशासक ठरवणाऱ्या अबू आझमींवर एकनाथ शिंदेंचा प्रचंड संताप; आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवायची तयारी!!
- Delhi Assembly : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे – हरदीप पुरी