• Download App
    Asian Games 2023: रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसलेच्या धडाकेबाज खेळीने भारताला टेनिसमध्ये मिळाले सुवर्ण Asian Games 2023 Rohan Bopanna and Rituja Bhosle win gold in tennis for India

    Asian Games 2023: रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसलेच्या धडाकेबाज खेळीने भारताला टेनिसमध्ये मिळाले सुवर्ण

    खरंतर या भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आले आहे. टेबल टेनिसमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने मिश्र दुहेरीत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. Asian Games 2023 Rohan Bopanna and Rituja Bhosle win gold in tennis for India

    भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव केला. खरंतर या भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा  भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये सामना जिंकला.

    रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना तैपेई जोडीने 6-2 ने पराभूत केले. यानंतर भारतीय जोडीने दुस-या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तैपेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा 10-4 असा पराभव करत सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला.

    अजितदादांनी दिला दणका कारण शिंदे – फडणवीस सरकारमध्ये राहून भुजबळ चालवतात “राहुल अजेंडा”!!

    त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत 10-4 असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आणले.

    Asian Games 2023 Rohan Bopanna and Rituja Bhosle win gold in tennis for India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!